Home बीड बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचा कळस, खासदार बजरंग सोनवणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्र्यी अमीत...

बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचा कळस, खासदार बजरंग सोनवणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्र्यी अमीत शहांची भेट.

204

आशाताई बच्छाव

1001038912.jpg

बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचा कळस, खासदार बजरंग सोनवणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्र्यी अमीत शहांची भेट.
अपहरणाच्या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची केली मागणी
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 11/ 12/2024
बीड जिल्ह्यामध्ये खून मारामाऱ्या आणि अपहरणाच्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे असतांना पोलीस निपक्षपातीपणे कारवाई करायचे सोडून अशासकीय लोकांच्या दबावात काम करत आहेत. यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारीने कळस गाठला असून जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी व्हावी अपहरणाच्या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करावी या मागणीसाठी खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी अमित शहा यांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिले. दिल्ली येथे दिनांक 11 डिसेंबर रोजी खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली जिल्ह्यात बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत शहा यांना पत्र दिले असून पत्रात म्हटले आहे की, बीड जिल्ह्यात गेल्या पाच सहा वर्षांमध्ये कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत खराब झालेली आहे.हम करेसो कायदा असुन जाणिवपूर्वक जातीयवाद निर्माण करून सर्वसामान्य जनतेत दहशत निर्माण केली जात आहे.कोणत्याही प्रकरणात अशासकीय लोकांचा हस्तक्षेप होत असल्याने पोलीस यंत्रणा हातचे भावले बनवून काम करत आहे. अर्थातच पोलीस निपक्षपातीपणे काम करत नाहीत. परिणामी जिल्ह्यात वाळूमाफिया, भूमाफिया, गुटखा माफिया, खंडणी, खून, अवैध शस्त्रांचा व्यापार फोपावत आहे .परळीत अमोल डुबे यांचे अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्यात आली यानंतर त्यांना अंधाऱ्या रात्री घाटात सोडून दिले. मत्साजोग येथील तरुण तडफदार सरपंच संतोष देशमुख यांनी पवनचक्की प्रकरणात खंडणीला विरोध केला म्हणून अपहरण करून हत्या केली. संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्याचे कळताच मी जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांना सलग फोन केले. मेसेजेस केले. परंतु संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला. पोलीस अधीक्षक यांचा संपर्क होऊ शकला असता तर, कदाचित त्यांचा जीव वाचला असता यामुळे पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण होत आहे. बीड जिल्हा पोलिसांकडून खोट्या केसेस करणे आणि खऱ्या अपराधाकडे दुर्लक्ष करणे सरावाचे झाले आहे. यामुळे कायद्याची अंमलबजावणी होणे अशक्य झाले आहे. पाटोदा पंचायत समितीचे माजी सभापती गोवर्धन सानप हे दोन दिवस बेपत्ता होते त्यांचा ग्रामस्थांनी शोध घेतला परंतु दोन दिवसांनी त्यांचे प्रेत शेतात आढळून आले हा मृत्यू कशामुळे झाला याची ठोस कारण पोलिसांनी दिलेली नाही याबाबतही संशय आहे. अशा अपहरणाच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी याचबरोबर जिल्हा पोलीस दलाबाबत सामान्य माणसांच्या मनात अविश्वास निर्माण झालेला आहे. यामुळे केंद्रीय सुरक्षा यंत्रणेकडून विशेष पथक बीड जिल्ह्यात पाठवून या ठिकाणी कारवाया कराव्यात जेणेकरून पोलिसांकडून आयपीसी कलमांचा दुरुपयोग होणार नाही. पोलीस यंत्रणा कोणाच्या दबावात काम करणार नाही. याचबरोबर पवनचक्की कंपन्यांच्या गुंडांनी जो गुन्हेगारीचा आलेख वाढविण्याचे काम केले आहे तो आलेखही कमी होईल, गुंडगिरीचा वापर करत असल्यामुळे पवनचक्की कंपन्यावर गुन्हे दाखल करावेत असेही पत्रात म्हटले आहे. या विषयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने ठोस पाउले उचललेले जातील असे आश्वासन यावेळी खासदार बजरंग सोनवणे यांना दिले आहे.

Previous articleसहकार महर्षी बाळासाहेब पवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त दंतरोग शिबिर संपन्न
Next articleपत्रकार संरक्षण समितीची देगलूर तालुका कार्यकारिणीची जाहीर.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.