Home बीड अंबाजोगाईच्या शासकीय गोदामातील धान्याला पाय फुटले गरिबांना मिळणारे मोफत धान्य कोणाच्या घशात?

अंबाजोगाईच्या शासकीय गोदामातील धान्याला पाय फुटले गरिबांना मिळणारे मोफत धान्य कोणाच्या घशात?

145

आशाताई बच्छाव

1001003861.jpg

अंबाजोगाईच्या शासकीय गोदामातील धान्याला पाय फुटले गरिबांना मिळणारे मोफत धान्य कोणाच्या घशात?

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड/अंबाजोगाई दि:३० नोव्हेंबर २०२४ अंबाजोगाई येथील शासकीय गोदामात आलेल्या गहू आणि तांदळाला दहा किलोला कट्ट्यागणीस पाय फुटल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाला कोणाचे पाठबळ आहे, हा संशय व्यक्त केला जात आहे. स्वस्त धान्य दुकानदारांना दिलेल्या धान्यातून पोत्यातून माल कसा गायब होतो याकडे तहसीलदार व उपजिल्हाधिकारी लक्ष देणार का? तरी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शासनाच्या वतीने गरीब नागरिकांना गहू व तांदळाचे वाटप करते परंतु गरीबासाठी आलेले धान्य पोत्यातून गायब होऊ लागले आहे. अंबाजोगाईचे गोदाम रक्षक म्हणून एस. आर. बलुतकर यांची ऑर्डर झालेली असतानाही तहसीलदाराच्या आशीर्वादाने दुसऱ्याच व्यक्तीला या गोदामात बसविले आहे. त्यामुळे या गोदामात सध्या सावळा गोंधळ सुरू आहे. शासनाकडून पन्नास किलोच्या पोत्यामधील दहा किलो धान्य गायब होत असून हे धान्य कोणाच्या घशात जात आहे. हा संशयाचा विषय आहे शासकीय धान्य घोटाळ्यात बीड पासून स्थानिक पातळीपर्यंत यंत्रणा बरबटली असून याकडे कोणी लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. शासनाकडून नियमाप्रमाणे एका पोत्यामध्ये पन्नास किलो धान्य व पाचशे ग्रॅम पोत्याचे वजन क्रमबाह्य आहे. परंतु अंबाजोगाईच्या गोदामातून चाळीस किलो धान्य व पोत्याचे दोनशे चाळीस ग्रॅम या प्रमाणे धान्य स्वस्त धान्य दुकानदारांना वाटप होत आहे. शुक्रवारी येलडा येथील ग्रामपंचायत कार्यालया अंतर्गत असलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराला दिलेले धान्य पोत्यासह मोजमाप केले असता त्यात चाळीस किलो धान्य निघाले. उर्वरित दहा किलो धान्य कोणाच्या घशात गोदाम रक्षक घालीत आहे. याची चौकशी करणे अत्यंत गरजेचे आहे. अंबाजोगाईतील सावळ्या गोंधळाकडे जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हाधिकारी चौकशी करणार का? असा प्रश्न सर्व नागरिकांकडून उपस्थित होऊ लागला आहे.