Home जालना सिद्धार्थ महाविद्यालयात संविधान दिन साजरा

सिद्धार्थ महाविद्यालयात संविधान दिन साजरा

106

आशाताई बच्छाव

1000990416.jpg

सिद्धार्थ महाविद्यालयात संविधान दिन साजरा
प्रतिनिधी जाफराबाद -मुरलीधर डहाके
दिनांक 26/11/2024
जाफराबाद ,येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश देशमुख हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. बी. बी. चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ .एस. के. सर्जे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रा. अनिल वैद्य यांनी भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. त्यानंतर प्रमुख वक्ते प्रा.बी.बी चव्हाण यांनी आपल्या मनोगतामध्ये भारतामध्ये पूर्वीपार म्हणजे अगदी बुद्धकाळातही समता, स्वातंत्र्य, बंधुता,या नैतिक मूल्ये,अधिकार आणि कर्तव्येयांची जोपासना केली जात असे,भारत स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून कायदा, सुव्यवस्था, अधिकार,कर्तव्ये,श्रद्धा,उपासना, यांची अंमलबजावणी सुरू झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी२ वर्षे ११ महिने१८ दिवस सतत लिखाण करून भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली व त्यामध्ये न्याय, श्रद्धा, स्वातंत्र्य, समानता, बंधुता यावर आधारित भारतीय संविधान निर्माण केले म्हणून आज खंडप्राय अशा देशात आदर्श लोकशाही यशस्वीपणे वाटचाल करीत आहे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. देशमुख यांनी भारतीय संविधान व विद्यार्थ्यांचे कर्तव्य यावर सखोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एम.जी मोरे यांनी केले तर आभार प्रा.एस. टी. साळवे यांनी मानले.या कार्यक्रमाचे औचित्य साधून सिल्लोड शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव प्रा. डॉ.राहुलभाऊ म्हस्के यांच्या सौजन्याने संविधान उद्देशिकेच्या 1000 प्रती प्रा.अनिल वैद्य यांनी सिद्धार्थ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना तसेच न्यू हायस्कूल जाफराबाद व जाफराबाद पंचकृषीतील समस्त बौद्ध बांधवांनी आयोजित केलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील कार्यक्रमात वाटप केल्या.तसेच एन.एस. एस.विभागाच्या वतीने संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleश्री संतोष पाटील दानवे यांना मंत्री पदाची लॉटरी लागण्याची शक्यता …..
Next articleप्रबोधनकार कला साहित्य संघटनेच्या वतीने संविधान दिन साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.