Home बुलढाणा क्राईम ! बुलढाण्याचा बिहार होतोय? जयश्रीताईंचा घणाघात ! – आधी मेहकरात भीषण...

क्राईम ! बुलढाण्याचा बिहार होतोय? जयश्रीताईंचा घणाघात ! – आधी मेहकरात भीषण राडा तर मोताळा येथे रॉडने एकाचे हात-पाय फॅक्चर !

112

आशाताई बच्छाव

1000990035.jpg

क्राईम ! बुलढाण्याचा बिहार होतोय? जयश्रीताईंचा घणाघात ! – आधी मेहकरात भीषण राडा तर मोताळा येथे रॉडने एकाचे हात-पाय फॅक्चर !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :– मोताळा तालुक्यातील निवडणुकीच्या जय- पराजयाच्या पार्श्वभूमीवर खूनशी वृत्ती वाढल्याचे चित्र असून बुलढाण्याचा बिहार होतो काय? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला आहे. मेहकरात पराभव जिव्हारी लागल्याने गाड्या पेटवून दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याची शाई वाळत नाही तोच मोताळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावर थोड्या वेळापूर्वी प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.