Home बुलढाणा ब्रेकिंग – उबाठाच्या सिद्धार्थ खरात यांना धमक्या ! – पराभव पचवता आला...

ब्रेकिंग – उबाठाच्या सिद्धार्थ खरात यांना धमक्या ! – पराभव पचवता आला पाहिजे ! -चारी मुंड्या चीत झाले तरी डॉ. रायमुलकरांचा अहंकार कमी होईना ! – आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले..’ अंगावर आले तर शिंगावर घेण्याची तयारी’

83

आशाताई बच्छाव

1000990378.jpg

ब्रेकिंग – उबाठाच्या सिद्धार्थ खरात यांना धमक्या ! – पराभव पचवता आला पाहिजे ! -चारी मुंड्या चीत झाले तरी डॉ. रायमुलकरांचा अहंकार कमी होईना ! – आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले..’ अंगावर आले तर शिंगावर घेण्याची तयारी’
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- मेहकर तालुक्यातील निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे
गटाचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी प्रस्थापित शिंदे गटाचे आमदार डॉ. रायमुलकरांचा दारूण पराभव केल्याने हा पराभव त्यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी विजयी उमेदवार सिद्धार्थ खरात यांची विजयी मिरवणूक अडवली होती. दरम्यान खरातांना डॉ. रायमुलकर यांनी हातपाय कलम करण्याची धमकी दिल्याने काही काळ वातावरण तापले होते. परंतु संयम बाळगत सिद्धार्थ खरात यांनी मिरवणुकीचा मार्ग बदलविला. दरम्यान ‘अंगावर आले तर शिंगावर घेण्याची तयारी’ असल्याची प्रतिक्रिया खरात यांनी ‘युवा मराठा ‘ला दिली आहे.
आश्वासक चेहरा परंतू नवखे उमेदवार असूनही खरात
यांनी 3 पंचवार्षिक आमदार राहिलेले महायुतीचे उमेदवार डॉ. संजय रायमुलकर यांचा पराभव केलाय. मेहकर विधानसभा मतदारसंघ हा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा बालेकिल्ला मानला जातो. तर या ठिकाणी संजय रायमुलकर हे 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. परंतु, यावेळेस मंत्रालयीन कामकाजाचा 30 वर्षांचा अनुभव असलेले, राज्य सरकारचे माजी अधिकारी सिद्धार्थ खरात यांनी रायमुलकरांचा पराभव केला आहे. डॉ संजय रायमुलकर यांच्या पदरात मतदारांनी 99423 मतं टाकली, तर सिद्धार्थ खरात यांना 104242 मतदारांनी भरभरून मते दिली. त्यामुळंच सिद्धार्थ खरात यांचा 4819 मतांनी दणदणीत विजय झालाय. परंतु हा
पराभव डॉ. रायमुलकर यांना पचवता आला नाही. सिद्धार्थ खरात यांची विजयी मिरवणूक निघाली असताना दोनशे ते तीनशे कार्यकर्त्यांनी त्यांची मिरवणूक अडवली. यावेळी मोठा राडा झाला असता, परंतु मी दोन पावले मागे घेऊन संयम पाडल्याचे सिद्धार्थ खरात म्हणाले. रॅलीचा मार्ग बदलवला. रायमुलकर यांना पराभव पचला नाही, पराभव पचवता आला पाहिजे. त्यांनी 15 ते 20 वर्ष राजकारण केले पण या राजकारणात गुंडशाही दिसून आली. आगामी काळात कायदा व सुव्यवस्थेचे राजकारण करण्यासाठी मी प्रयत्न करत असून, जर कोणी ‘अंगावर आले तर शिंगावर घेण्याची तयारी’ असल्याचेही खरात म्हणाले आहेत.

Previous articleक्राईम ! बुलढाण्याचा बिहार होतोय? जयश्रीताईंचा घणाघात ! – आधी मेहकरात भीषण राडा तर मोताळा येथे रॉडने एकाचे हात-पाय फॅक्चर !
Next articleनंदलाल पाटील कापगते विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.