आशाताई बच्छाव
24 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; मलकापूर तालुक्यातील घटना
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-मलकापूर तालुक्यातील झोडगा येथील तरुणाची दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि 7 मे रोजी सकाळी उघडीस आली. या बाबत सविस्तर वृत्त असे की झोडगा अनुराबाद येथील आकाश अरुण मोरे वय 24 रा. झोडगे याने आज सकाळी 7.30 च्या सुमारास धरणगाव येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 नजीक शेतातील निनु पुजाजी पाटील यांच्या शेतात लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. आकाश चे आई वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात तसेच आकाश हा एकुलता एक होता. या घटनेचे माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून शरीर मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदना करीता पाठविले. घटनेचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक नरेंद्रसिंह ठाकूर करीत असून पुढील तपास रोकडे हे करीत आहेत.






