आशाताई बच्छाव
बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस केले जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखा जालना यांची कारवाई
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक 26/10/2024
याविषयी सविस्तर माहिती अशी की, जालना जिल्ह्यामध्ये अवैध अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीची माहिती घेऊन कारवाई करणे बाबत मा. पोलिस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल यांनी स्थानिक गुन्हे शाखा जालना चे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव व पथकास सूचना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव यांनी पथक तयार करून कारवाई करणे बाबत मार्गदर्शन केले होते.
दिनांक 26 /10 /2024 रोजी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीची माहिती घेत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की ,आरोपी गजानन बाळू राठोड वय 25 वर्ष व्यवसाय मजुरी राहणार रुई श्रीराम तांडा तालुका अंबड जिल्हा जालना याच्याकडे अवैधरित्या भरमार अग्निशस्त्र आहे. त्यानुसार आरोपी गजानन राठोड याचा शोध घेत असताना तो त्याच्या श्रीराम तांडा अंबड जिल्हा जालना येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याकडे तो बाळगत असलेल्या भर्मार अग्निशस्त्र बाबत चौकशी केली असता त्याने भरमार अग्निशस्त्र काढून दिल्याने पोस्टे तीर्थपुरी जालना येथे भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलिस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड श्री विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव, सपोनी श्री साजिद अहमद, पोलीस उपनिरीक्षक श्री राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार लक्ष्मीकांत आडेप ,सागर बाविस्कर, देविदास भोजने, अंकुश धांडगे, भागवत खरात, कैलास चेके, नारायण माळी यांनी केली आहे.