Home भंडारा 23 नोव्हेंबरला 114 गोवारी शहीद झाले! त्याच दिवशी मतमोजणी होऊन विजयाचा जल्लोष...

23 नोव्हेंबरला 114 गोवारी शहीद झाले! त्याच दिवशी मतमोजणी होऊन विजयाचा जल्लोष साजरा करणार काय ?

345

आशाताई बच्छाव

1000889619.jpg

23 नोव्हेंबरला 114 गोवारी शहीद झाले! त्याच दिवशी मतमोजणी होऊन विजयाचा जल्लोष साजरा करणार काय ?

निवडणूक आयोगाने तारखेत बदल करावा -संयुक्त रिपब्लिकन आघाडी

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) आज दिनांक 15 ऑक्टोबर 2024 ला दुपारी ३.३० वाजता निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र व झारखंड या राज्यांच्या निवडणुकीचा वेळापत्रक जाहीर केला. त्यात महाराष्ट्राची निवडणूक एकाच टप्प्यामध्ये 20 नोव्हेंबरला होणार आहे व 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे
23 नोव्हेंबर 1994 ला 114 गोवारी शहीद झाले .आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार असेल तर 114 गोवारीना मानवंदना देण्याऐवजी आपण त्या दिवशी फटाके फोडून मिरवणुकीचा उत्सव साजरा करणे ही योग्य नाही? कारण 23 नोव्हेंबरला 114 गोवारी आपल्या आरक्षणाच्या हक्कासाठी शहीद झाले. आपण त्यांना त्या दिवशी मानवंदना दिली पाहिजे .महायुती जर विजय झाली तर त्यांच्या पक्षातर्फे फटाके फुटतील व महाविकास आघाडी विजय झाली तर त्यांच्यातर्फे राज्यांमध्ये फटाके फुटतील व दिवाळी साजरी होणार आहे .
परंतु 23 नोव्हेंबर 1994 ला नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान गोवारी समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून कास्ट सर्टिफिकेट व कास्ट व्हॅलिडीटी देण्यात यावी या मागणी करता नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात भव्य मोर्चा काढला होता. त्या मोर्चादरम्यान चेंगराचेंगरीत 114 गोवारी शहीद झाले आणि 500 नागरिक जखमी झाले. नागपूर पोलीस लाठी चार्ज च्या माध्यमातून गोवारी समाजाच्या मोर्चा कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत होते. त्याच माध्यमातून चेंगराचेंगरीत 114 गोवारी शहीद झाले.त्या दिवशी निवडणूक आयोग विजय उत्सव साजरा करणार आहे का? आणि फटाके फोडणार आहेत का !याचा विचार करावा .
करिता संयुक्त रिपब्लिकन आघाडी विदर्भ प्रदेश जिल्हा भंडारा तर्फे निवडणूक आयोगास अशी विनंती करण्यात येत आहे की, 23 नोव्हेंबर 2024 ला जाहीर होणारा निवडणुकीचा निकाल 22 नोव्हेंबर 2024 किंवा 24 नोव्हेंबर 2024 जाहीर करावा अशी मागणी निवडणूक आयोगाला संयुक्त रिपब्लिकन आघाडी विदर्भ प्रदेश तर्फे
विदर्भ संयोजक चंद्रशेखर टेंभुर्णे ,रोशनभाऊ जांभुळकर , साहित्यिक अमृत बनसोड , अमृत गजभिये नागपूर, आसित बागडे ,डॉ सुरेश खोब्रागडे, विजय भोवते ,राजेश मडामे,दिलीप वानखेडे, ग्यानचंद ताराचंद जांभूळकर, रमेश जांगडे, शिवदास गजभिये, पत्रकार संजीव भांबोरे यांनी एका पत्रकाद्वारे केलेली आहे.

Previous articleगाऊन तोंडावर टाकून ‘सौभाग्य’ लांबविले!
Next articleसंविधान, आरक्षणाचे राजकारण करून महाराष्ट्राला जातीय संघर्षात लोटणाऱ्या महाविकास आघाडी व महायुतीला मतदारांनी पराभूत करावे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.