Home भंडारा शासनाने शंभर रुपयाचे मुद्रांक बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा – नाशिक चवरे

शासनाने शंभर रुपयाचे मुद्रांक बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा – नाशिक चवरे

142

आशाताई बच्छाव

1000819094.jpg

शासनाने शंभर रुपयाचे मुद्रांक बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा – नाशिक चवरे

 

 

संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी) नुकताच महाराष्ट्र सरकारने शंभर
रुपयाचे मुद्रांक बंद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला असून यापुढे प्रतिज्ञापत्र, शपथपत्र , वाटणीपत्र , पतसंस्था कामे , करारनामा भाडे , सामंजस्य करार ,विवाह नोंद प्रतिज्ञापत्र , खरेदी विक्री करार पत्र ,शैक्षणिक , बँक , न्यायालय , इत्यादी कामाकरिता 500 रुपयाचे मुद्रांक घ्यावे लागणार आहे . परिणामी 100 रुपयाच्या मुद्रांकावर होणाऱ्या कामासाठी 500 रुपयांचा मुद्रांक लागणार आहे . याकरिता 400 रुपये अधिकचे मोजावे लागणार आहे व याची आर्थिक झळ सामान्यांच्या खिशाला बसणार आहे . विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शासन अनेक योजनांच्या पाऊस पाडत आहे . तर दुसरीकडे शंभर रुपयाचे मुद्रांक बंद करून पाचशे रुपयांचे केल्यामुळे सामान्य जनतेला आर्थिक भुर्दंड
सहन करावा लागणार आहे . आधीच महागाईने बेजार असलेल्या नागरिकांचे कंबरडे मोडले जाणार आहे . राज्य शासनाने सर्वसामान्य जनतेचा विचार करून मंत्रिमंडळात घेतलेला निर्णय मागे घेऊन पूर्वीप्रमाणे 100 रुपयाचे मुद्रांक कायम ठेवण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नाशिक चवरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे .

Previous articleनिवडणुकीतील राजकारण राजकारणात प्रामाणिकपणा उरला नाही. —
Next articleखूशखबर! पीएम किसानचा १८वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.