Home वाशिम अजगराने गिळले चक्क नीलगाय चे पिल्लू वनोजा येथे पुन्हा ९ फूट लांबीचा...

अजगराने गिळले चक्क नीलगाय चे पिल्लू वनोजा येथे पुन्हा ९ फूट लांबीचा अजगर…..

159
0

आशाताई बच्छाव

1000816214.jpg

वाशिम,गोपाल तिवारी, ब्युरो चीफ 
अजगराने गिळले चक्क नीलगाय चे पिल्लू वनोजा येथे पुन्हा ९ फूट लांबीचा अजगर…..
वाशीम जिल्ह्यातील वनोजा येथील दिलीप गावंडे यांच्या शेतात त्यांना एक मोठा साप दिसून आला.तसेच तो नीलगाय चे पिल्लु गिळत होता पण शेतकऱ्याची चाहूल लागल्यामुळे त्याने भक्ष सोडून बाजूला निघून गेला हे सर्व दृश्य पाहून दिलीप गावंडे यांची भांबेरी च उडाली.यांनतर त्यांनी तत्काळ संबधित माहिती एम. एच. २९ हेल्पिंग हॅण्ड वाईल्ड ऍडवेंचर अँड नेचर क्लब यवतमाळ शाखा वाशिम चे सदस्य व सर्पमित्र तथा वन्यजीव रक्षक शुभम हेकड यांना दिली.यांनतर शुभम लगेच आपले सहकारी शुभम डुकरे यांच्या सह घटनास्थळी दाखल झाले व पाहाणी केली असता.एक अंदाजे ९ फूट लांबीचा अजगर त्यांना सोयाबीन मध्ये नीलगाय चे पिल्लू गिळताना दिसले.यांनतर त्यांनी अतिशय शिताफीने सदर अजगराला सुरक्षित रित्या रेस्क्यू केले.व संबधित माहिती कारंजा – मंगरूळपीर वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी श्री.अमित शिंदे यांच्या सह वनपाल श्री. सुदर्शन सोनवणे यांना दिली यांनतर वनरक्षक मनिष हुमने यांनी सदर सापाचा रीतसर पंचनामा करून सदर अजगराला निसर्ग अधिवासात मुक्त केले.गेल्या २ महिन्यात या संघटनेच्या सदस्यांनी तब्बल ६ मोठ मोठ्या अजगारांना पडकुन निसर्ग अधिवासात मुक्त केले.१ ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या वन्यजीव सप्ताहामध्ये अनेक सापांना जीवदान देण्याचे कार्य केले आहे.यामध्ये नाग गवत्या व अजगर सापाचा समावेश आहे.

Previous articleमोबाईल चोरी व देशी दारू बाळगल्या प्रकरणी 3 आरोपींना अटक ! -1 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत !
Next articleगडचिरोली जिल्ह्यात राजकीय नेतृत्व निर्माण होऊ नये म्हणून आपला विरोध
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here