Home गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात राजकीय नेतृत्व निर्माण होऊ नये म्हणून आपला विरोध

गडचिरोली जिल्ह्यात राजकीय नेतृत्व निर्माण होऊ नये म्हणून आपला विरोध

101

आशाताई बच्छाव

1000816216.jpg

गडचिरोली जिल्ह्यात राजकीय नेतृत्व निर्माण होऊ नये म्हणून आपला विरोध

आमदार डॉक्टर देवरावजी होळी

गडचिरोली येथे गोंड समाज संघटनेच्या वतीने राणी दुर्गावती जयंती समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन                                            गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 

मागील १० वर्षापासून आपल्या आमदारकीच्या काळात गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपण केलेल्या  विकास कामामुळे जनतेमध्ये आपली लोकप्रियता वाढत चालली असून एक नवीन राजकीय नेतृत्व उदयास होताना दिसून येत असल्याने  आपले विरोधक नवीन राजकीय नेतृत्व निर्माणच होऊ नये म्हणून आपला विरोध करीत असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली येथे  गोंड समाज संघटनेच्या वतीने आयोजित राणी दुर्गावती जयंती समाज प्रबोधन कार्यक्रमाच्या प्रसंगी केले.

यावेळी मंचावर माजी आमदार हरिरामजी वरखडे माजी आमदार डॉक्टर नामदेवराव उसेंडी , माजी आमदार हिरामणजी वरखडे, पावीमुरांडा जमीनदार तथा जिल्हा जंगल कामगार सोसायटीचे अध्यक्ष पूर्णचंद्रराव रायसिडाम,    जिल्हा शिल्लक चिकित्सक डॉक्टर माधुरी किलनाके , डॉक्टर प्रमोद खंडाते ,  प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार डॉक्टर देवरावजी होळी म्हणाले की, आपण सातत्याने विकास कामांचे स्वप्न घेऊन  काम करीत आहोत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये आपण  लोकप्रिय होत असून  भविष्यातील   सक्षम राजकीय नेतृत्व असल्याचे जनतेला दिसून आले आहे. मात्र आपले विरोधक हे होऊ नये , गडचिरोली जिल्ह्यात राजकीय नेतृत्व निर्माण होवू नये यासाठी प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

Previous articleअजगराने गिळले चक्क नीलगाय चे पिल्लू वनोजा येथे पुन्हा ९ फूट लांबीचा अजगर…..
Next articleआपल्या समाजामध्ये राजकीय जागरूकता असणे महत्त्वाचे आहे.- डॉ मिलिंद नरोटे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.