Home भंडारा पहेला येथे निशुल्क मोतीबिंदू नेत्र तपासणी व शत्रक्रिया शिबिराचे 5 ऑक्टोंबरला आयोजन

पहेला येथे निशुल्क मोतीबिंदू नेत्र तपासणी व शत्रक्रिया शिबिराचे 5 ऑक्टोंबरला आयोजन

122

आशाताई बच्छाव

1000805631.jpg

पहेला येथे निशुल्क मोतीबिंदू नेत्र तपासणी व शत्रक्रिया शिबिराचे 5 ऑक्टोंबरला आयोजन

संजीव भांबोरे
भंडारा(जिल्हा प्रतिनिधी) भंडारा तालुक्यातील पहेला येथील ग्रामपंचायत कार्यालय सभागृहात 5 ऑक्टोंबर 2024 ला सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत समता फाउंडेशन महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर व ग्रामपंचायत कार्यालय पहेला यांच्या सहकार्याने निशुल्क नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या नेत्र शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची मोफत तपासणी आणि योग्य सल्ला मार्गदर्शन केले जाईल. मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची महात्मे नेत्र रुग्णालय सोमलवाडा नागपूर येथे मोफत शस्त्रक्रिया केली जाईल. मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची जाने येणे,राहण्याची, जेवण्याची मोफत सोय केली जाईल. शिबिरात मोतीबिंदू असलेल्या रुग्णांना भरतीची तारीख शिबिराच्या दिवशी दिली जाईल. रुग्णांनी तपासणीला येते वेळेस आधार कार्ड व घरचा मोबाईल नंबर सोबत आणावे .वरील शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन समता फाउंडेशन महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर ,ग्रामपंचायत कार्यालय पहेला यांनी केलेले आहे.

Previous articleलाडक्या बहिणींनी आमदार होळी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे
Next articleनिवडणुकीपूर्वी मराठ्यांच्या मागणीचा विचार करा: मनोज जरांगे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.