Home संपादकीय पत्रकारितेच्या दुनियेतील “राजा” माणूस हरपला…! सच्चा सहकारी राजेंद्रकुमार राठोड सदैव स्मरणात राहतील

पत्रकारितेच्या दुनियेतील “राजा” माणूस हरपला…! सच्चा सहकारी राजेंद्रकुमार राठोड सदैव स्मरणात राहतील

61
0

आशाताई बच्छाव

1000792103.jpg

पत्रकारितेच्या दुनियेतील “राजा” माणूस हरपला…!
सच्चा सहकारी राजेंद्रकुमार राठोड सदैव स्मरणात राहतील
(राजेंद्र पाटील राऊत)
वाचकहो,
काल संध्याकाळी मोरेचा फोन आला, आणि अचानक धक्काच बसला.त्याने केलेल्या फोनवर प्रथम तर विश्वासच बसत नव्हता.पण…सत्य हे स्विकारावेच लागते.जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला मृत्यू हा अटळ आहे.मात्र ऐन उमेदीच्या व तारुण्याच्या उंबरठ्यावर अकाली मृत्यू म्हणजे मनाला चटका लावून जाणारे ठरते.म्हणतात ना “पराधीन आहे पुत्र जगती मानवाचा” अगदी तसेच काही झाले.माझा जिवलग मित्र सहकारी राजेंद्रकुमार राठोड मेहुणेकर यांचे काल सायंकाळी अल्पशा आजाराने उपचारा दरम्यान आकस्मिक निधन झाले.खरं तर राजूदादाचा स्वभाव हा मितभाषी व मनमिळाऊ असल्याने गेल्या चाळीस वर्षापासूनची माझी दादासोबत निस्वार्थ मैत्री अगदी कालपर्यंत टिकून होती.राजेंद्रकुमार राठोड यांचे मुळगाव जळगाव जिल्ह्यातील थाळनेर मात्र त्यांचे वडील चुनीलाल राठोड हे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत व-हाणेपाडा येथे नोकरीस असल्याने राजेंद्रकुमार राठोड यांचे संपूर्ण जीवनच मेहुणे, कौळाणे, निमगाव,व-हाणे या परिसरात गेले.बहुतेक सन १९८५-८६ ची गोष्ट असेल, आम्हा ग्रामीण मित्रमंडळीचा निमगाव परिसर ग्रामीण पत्रकार संघ होता.राजेंद्रकुमार राठोड हे दैनिक देशदूत वृत्तपत्रांचे प्रतिनिधी होते.तर साहेबराव सोनवणे व-हाणकर हे लोकमतसाठी काम करायचे.राजेंद्र हिरे गावकरीसाठी तर मी स्वतः दैनिक सकाळसाठी पत्रकार म्हणून काम करायचो.दर सोमवारी न चुकता निमगावला साहेबराव व-हाणकरच्या हाँटेलमध्ये आमच्या बैठका व्हायच्या,आम्हा सगळ्यांमध्ये राजेंद्रकुमार राठोड हे आगळेवेगळे पत्रकार म्हणून कार्यरत होते.सत्य परिस्थिती वरील बातम्यांवर लेखन करणे हि त्यांची खासियत होती.कुठलाही गर्व व अभिमान नसलेला माझा हा मित्र पुढे पत्रकरिते पासून दुर जाऊन मालेगाव शहरात मुद्रांक विक्रेता व लेखनीक म्हणून अल्पावधीतच आपल्या कार्याचा ठसा उमटविला.व संपूर्ण तालुका पातळीवर नावलौकिक मिळविला.अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत संघर्ष करीत गरीबीचे चटके सोसत राजुदादांनी स्वबळावर शुन्यातून विश्व निर्माण केले.आता कुठे राजेंद्रकुमार राठोड यांना थोडे सुखा समाधानाचे दिवस आले होते.तर काळाने अचानक हा असा घाला घालून एक जिवलग सहकारी मित्र आमच्या मित्रमंडळातून कायमचा हरवून नेला.आम्हा सगळ्या मित्रमंडळींना या अकाली दुर्घटनेने कायमचे पोरके करून टाकले.कै.राजेंद्रकुमार राठोड यांची आठवण सदैव आमच्या मनात घर करुन राहिलं.कै.राजेंद्रकुमार राठोड यांच्या मृत्म्यांम्यास परमेश्वर चिरशांती देवो हिच मनःपूर्वक प्रार्थना व भावपूर्ण श्रद्धांजली.!
राजेंद्र पाटील राऊत
मुख्य संपादक युवा मराठा न्यूज चॅनल महाराष्ट्र
संस्थापक संपादक युवा मराठा महासंघ महाराष्ट्र
संस्थापक अध्यक्ष आश्रयआशा फाउंडेशन महाराष्ट्र

Previous article१० वर्ष केवळ विधानसभा क्षेत्राच्या विकासाचा ध्यास घेऊन काम आमदार डॉक्टर देवरावजी होळी
Next articleसंत तुकाराम सभागृह भंडारा येथे विविध ओबीसी संघटनेची सभा संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here