Home बुलढाणा बिबट्या, तडस्या वाघोबा पाहिला असेल पण हे बोकोबा पाहिलेत का? -बोकोबांनी केले...

बिबट्या, तडस्या वाघोबा पाहिला असेल पण हे बोकोबा पाहिलेत का? -बोकोबांनी केले जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळे मिटून कोट्यावधींचे साहित्य फस्त ! -यांच्या शिकारी कोण करणार ? – शिकारी सुद्धा पैशांच्या जाळ्यात अडकले काय?

33
0

आशाताई बच्छाव

1000783774.jpg

बिबट्या, तडस्या वाघोबा पाहिला असेल पण हे बोकोबा पाहिलेत का? -बोकोबांनी केले जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळे मिटून कोट्यावधींचे साहित्य फस्त ! -यांच्या शिकारी कोण करणार ? – शिकारी सुद्धा पैशांच्या जाळ्यात अडकले काय?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– बुलढाणा जंगलव्याप्त बुलढाणा जिल्ह्यात खामगाव व अकोला रस्तावरील ज्ञानगंगा अभयारण्य असल्याने आपण बिबट्यां सारख बोक,, तडस, वन्य प्राणी पाहिले असाल किंवा डोळे मिटून दूध पिणारी मांजर व बोक्या घरामध्ये पाहिला असाल परंतु जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोट्यावधींचे उपकरणे बोगस बिल काढून खाणारे बोके, तडस, मांजर काही वगळता वरिष्ठांच्या पिंजऱ्यांमध्ये अजूनही अडकलेले नाहीत. केवळ एक
अत्यंत खादाडा प्राणी जाळ्यात अडकला की अडकवलाय ? हा प्रश्न असून इतरांचा मुक्त संचार सुरू असून अकोला आरोग्य उपसंचालकापर्यंत साखळी असलेल्यांची कोण शिकार करणार ? असा गंभीर प्रश्न निर्माण झालाय.
बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात कोट्यावधींचा प्रचंड भ्रष्टाचार झाला असून आरोपींवर दोष सुद्धा सिद्ध झाला आहे. अंतिम विभागीय चौकशी अहवालाने हे दाखवून दिले तरी केवळ वादग्रस्त भांडारपाल प्रकाश नामदेव बोथे सस्पेंड झाला. मात्र उपसंचालक भंडारी यांना पुढील कारवाईस अद्याप पर्यंत मुहूर्त का भेटला नाही हे न समजणारे कोडे आहे. पण ‘पब्लिक सब जानती है’ हे त्यांना माहीत
नसावे.. जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचारी प्रकाश नामदेव बोथे मुळ चालक, नंतर कनिष्ठ लिपीक यांची विभागीय चौकशी 24 एप्रिल 2024 रोजी प्राप्त झाली. कार्यालयीन दोष व शासकीय रकमेचा अपहार, खरेदी घोटाळा असे गंभीर स्वरूपाचे आरोप बोथेवर असल्याने या प्रकरणाचा सखोल अभ्यास करण्यात आलेला आहे. याप्रकरणी त्याला नोकरी पासून हात धुवावे लागले. जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचारी प्रकाश नामदेव बोथे मुळ चालक, नंतर कनिष्ठ लिपीक यांची विभागीय चौकशी 24 एप्रिल 2024 रोजी प्राप्त झाली. कार्यालयीन दोष व शासकीय रकमेचा अपहार, खरेदी घोटाळा असे गंभीर स्वरूपाचे आरोप बोथेवर असल्याने या प्रकरणाचा सखोल अभ्यास करण्यात
आलेला आहे. याप्रकरणी त्याला नोकरी पासून हात धुवावेत लागले. परंतु या भ्रष्टाचाराच्या तळ्यातील अनेकांनी पाणी पिले असून ते मात्र अलिप्तच आहेत. शिवाय दोषारोपसिद्ध होऊन देखील अकोला आरोग्य उपसंचालक भंडारी या भ्रष्टाचाराच्या पंढरीकडे अजूनही वळून पाहत नाहीत. त्यामुळे भ्रष्टाचाराची साखळी असलेल्या या खाबूगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात बुलढाणा जिल्ह्यात प्रचंड रोष निर्माण होत असून अनेकांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे. या भ्रष्टाचार प्रकरणी युवा मराठा न्यूज वृत्तवाहिनी बुलढाणा ने पाठपुरावा केला होता हे विशेष !
नेहमी चर्चेत असलेले निलंबित भांडारपाल प्रकाश
नामदेव बोथे

यांच्यासह इतरांची झालेल्या चौकशीत करोडो रुपये भ्रष्टाचार प्रकरणात दोष सिद्ध झाले असून निलंबित वादग्रस्त भांडारपाल प्रकाश नामदेव बोथे यांना बडतर्फ करून भ्रष्टाचारातुन कमावलेली करोडो रुपयांची चल अचल संपत्ती त्वरित सील करून त्याचे लिलाव करण्यात यावा असे विभागीय अहवालात नमूद असून उपसंचालक डॉ. कमलेश भंडारी यांना ऑगस्ट महिन्यात पत्र देऊनही अद्याप त्यांनी कोणतीच कारवाई केली नसून त्यांना या प्रकरणाची माहितीसाठी कॉल करूनही हे अधिकारी कॉल सुद्धा घेत नाही व माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे.

Previous articleब्रेकिंग ! खामगाव येथील सर्वात मोठ्या श्रीहरी लॉन्सला भीषण आग! लाखोंचे नुकसान
Next articleजिल्ह्यात पावसाचा ऐलो अलर्ट, बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाट,व मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here