Home बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा ऐलो अलर्ट, बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाट,व मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता….

जिल्ह्यात पावसाचा ऐलो अलर्ट, बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाट,व मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता….

103

आशाताई बच्छाव

1000783776.jpg

जिल्ह्यात पावसाचा ऐलो अलर्ट, बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाट,व मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-बुलढाणा भारतीय मौसम विभाग नागपूर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार दि. 29 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्याला ऐलो अलर्ट प्राप्त झाला आहे. त्यानुसार बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाट, मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.
खबरदारीचा उपाय म्हणुन पाऊस, विजा चमकत असतांना बाहेर जावयाचे टाळावे. विजांपासून संरक्षणाकरिता दामिनी अॅपचा वापर करावा व झाडांपासून दुर राहावे. दुभती तसेच इतर जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. शक्य असल्यास ज्या धान्यांची कापनी झालेली आहे ते धान्य सुरक्षित ठिकाणी हालवावे. पाऊस, वादळ सुरु असतांना विजेच्या तारा कोसळण्याची शक्यता असते. तरी त्या पासुन दूर राहण्याची खबरदारी घ्यावी. याबाबत सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे,असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.