Home बीड मांजरा प्रकल्प ९५% भल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा !

मांजरा प्रकल्प ९५% भल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा !

161

आशाताई बच्छाव

1000779520.jpg

मांजरा प्रकल्प ९५% भल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा !

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/केज दि: २५ सप्टेंबर २०२४ बीड जिल्ह्यातील मांजरा प्रकल्प ९५%भरले असल्याने कोणत्याही वेळी पाणी सांडव्यातून सोडून विसर्गाची शक्यता असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ठीक ६:०० वा. मांजरा प्रकल्प ९५.०५% क्षमतेने भरला असून पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरण कोणत्याही क्षणी पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात होणारी पाण्याची आवक पाहता मांजरा धरणाच्या सांडव्याद्वारे मांजरा नदी पात्रात कोणत्याही क्षणी विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. तसेच धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. तरी मांजरा नदी काठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी सतर्क रहावे. कोणीही मांजरा नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जिवीत अथवा वित्त हानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

Previous articleमाहोरा येथे स्काऊट गाईड संघ नायक प्रशिक्षण शिबीर संपन्न..
Next articleसोनई जगदंबा मातेच्या भव्य दिव्य प्रांगणामध्ये आयोजित श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.