Home जालना सिद्धार्थ महाविद्यालयात वाड्;मय मंडळाचे उद्घाटन

सिद्धार्थ महाविद्यालयात वाड्;मय मंडळाचे उद्घाटन

103

आशाताई बच्छाव

1000778057.jpg

सिद्धार्थ महाविद्यालयात वाड्;मय मंडळाचे उद्घाटन.

तालुका प्रतिनिधी जाफ्राबाद-मुरलीधर डहाके
दिनांक२४/०९/ २०२४
जाफराबाद येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वांड्.मय मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी प्रोफेसर डॉ. राम रवणेकर उद्घाटक म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. र.तु. देशमुख हे होते .प्रमुख उपस्थितीमध्ये वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. सुनिल मेढे ,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. विनोद हिवराळे ,यांची उपस्थिती होती.
उदघाटनपर भाषणात आपले विचार मांडत असताना डॉ. राम रवणेकर म्हणाले की, मराठी साहित्याचे दालन हे खूप समृद्ध आहे यामध्ये ज्ञानेश्वर, तुकोबाराय यांच्या अभंगाची आठवण करून देताना व आजच्या सामाजिक परिस्थितीची बदललेली अवस्था पाहता त्यांनी खंत व्यक्त केली. ज्यामध्ये आज माणूस माणसापासून पूर्णतः दुरावत चालला आहे. याला जोडण्याचे काम संत साहित्य करू शकते असे प्रतिपादन केले. त्याचप्रमाणे भाषा व साहित्य भारताच्या तसेच भारतातील प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी आवश्यक आहे हे वाङ्मयाच्या माध्यमातूनच शक्य आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रोफेसर डॉ.विजय पाटील यांनी करते वेळी भाषेचा गौरव करताना व वाङ्मयाचा इतिहास मांडताना संत साहित्यापासून आजपर्यंतच्या आधुनिक काळातील साहित्यिकां पर्यंतचा इतिहास मांडला. यामुळे संपूर्ण वाङ्मयात एक नवचैतन्य निर्माण करणाऱ्या नवोदित कवी ,साहित्यिक यांना प्रोत्साहनच मिळेल असे मत व्यक्त केले .महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वांगमयाची गोडी लागावी याकरिता सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षिय भाषणांत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. र.तु.देशमुख यांनी आपल्या भाषणात महाविद्यालयाच्या मुला मुलींमध्ये वाङ्मयाची गोडी लागण्याकरिता संत साहित्यापासून ग्रामीण साहित्य व आधुनिक साहित्यापर्यंत च्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला . वांगमय मंडळाची निर्मिती महाविद्यालयात करण्याचा उद्देश विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी यासाठी
अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मराठीचे अद्य् कवी मुकुंदराज यांच्या विवेकसिंधु ग्रंथापासुन आधुनिक काळातील नवोदित कवी, कांदबरीकार, कथाकार,नाटयलेखका पर्यंत साहित्याचा आढावा घेतला.या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रके तयार केली त्यांचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन कु. शालिनी वाघ, कु. हर्षदा तांबेकर यांनी केले या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी,शिक्षक, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार हिंदी विभागाचे प्राध्यापक अनिल वैद्य यांनी मानले. व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous articleहिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील सकल मराठा समाजा कडुन औंढा नागनाथ पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
Next article33 वर्षांनी एकत्र आले वर्गमित्र, शाळेत रंगला माजी विद्यार्थी मेळावा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.