Home विदर्भ हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील सकल मराठा समाजा कडुन औंढा नागनाथ पोलीस...

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील सकल मराठा समाजा कडुन औंढा नागनाथ पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

108

आशाताई बच्छाव

1000778037.jpg

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील सकल मराठा समाजा कडुन औंढा नागनाथ पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ -सामाजिक सलोखा बिघडवनाऱ्या लखन शिंदे ला तात्काळ अटक करा
मराठा समाज व मराठा योद्धा जरांगे पाटील यांचे विषयी बदनामीकारक पोस्ट करनारा समाजकंटक लखन शिंदे वर गुन्हा नोंद करून त्याला तात्काळ अटक करावी अशी मागणी सकल मराठा समाजाचे वतीने आज औंढा पोलिस स्टेशन येथे करण्यात आली.
मागील बऱ्याच दिवसांपासून मराठा समाजाची बदनामी करण्याचे काम सदरील इसम करत होता परंतु स्थानिक पातळीवर इतर सर्व समाजबांधव आपल्या सोबत असल्या मुळे अश्या भुरट्या लोकांकडे आपण दुर्लक्ष करत होतो परंतु गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या बदनामी कारक पोस्ट वाढत चालल्या आहेत सदरील इसमाला पोलिस प्रशासनाने तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी या मागणी साठी निवेदन देण्यात आले आहे.
कुठल्याही नेत्याला राजकीय दबावाला बळी पडून कार्यवाही करण्यास दिरंगाई केलीजाऊ नये यानंतर काही अनुचित घटना घडली तर याला सर्वस्वी पोलिस प्रशासन जिम्मेदार असेल असा इशारा सकल मराठा समाजा कडून लेखी देण्यात आला आहे.