Home विदर्भ मराठा आरक्षणासंदर्भात 24 सप्टेंबर मंगळवार रोजी वसमत बंदची हाक.

मराठा आरक्षणासंदर्भात 24 सप्टेंबर मंगळवार रोजी वसमत बंदची हाक.

98

आशाताई बच्छाव

1000771937.jpg

मराठा आरक्षणासंदर्भात 24 सप्टेंबर मंगळवार रोजी वसमत बंदची हाक.                                            हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ 
अंतरवाली सराटी येथे मनोज दादा जरांगे यांनी उपोषणाला गेली सहा दिवस झाले.
या संदर्भात हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथून 24 सप्टेंबर रोज मंगळवारी वसमत बंदची सकल मराठा समाजाच्या वतीने हाक देण्यात आली आहे.
गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात अद्यापही कोणताही मार्ग काढला नसल्याने संतप्त झालेल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाचे आक्रोश अद्यापही सत्ताधारी शासनाच्या विरोधामध्ये ठीक ठिकाणी जिल्हा तालुका गाव पातळीवर मोर्चे त्याचबरोबर अमरण उपोषण सुरूच असताना 24 सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे सकल मराठा समाजाच्या वतीने बंची हा देण्यात आली आहे यामध्ये अत्यावश्यक सेवा मेडिकल हॉस्पिटल ॲम्बुलन्स आदी वगळता सर्व बंदमध्ये सहभागी होण्याची सकल मराठा समाज वसमत च्या वतीने देण्यात आली आहे .