आशाताई बच्छाव
मुख्यमंत्री ग्राम सडक योजने त अंतर्गत बांधकाम केलेल्या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम केल्या संदर्भात आमरण उपोषण. हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ
ठराव ते सातेफळ या गावाला जोडल्या जाणाऱ्या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसेवक योजनेअंतर्गत दत्तराज कॉन्ट्रॅक्टशन कातनेश्वर प्रायव्हेट लिमिटेड या या कंपनीला देण्यात आले होते सदरील कंपनीने काम व्यवस्थित न केल्याप्रकरणी थोरावा ते सातेफळ या गावाच्या सीमे वरील शिव रस्त्यावर संतोष सोमाजी गवळी. यांनी 16 सप्टेंबर पासूनउपोषणाला सुरुवात केली आहे
एकंदरीत शासनाने नेमून दिलेल्या कामामध्ये मोठी तफावत दिसून येत असल्याने दिनांक 16 जुलै रोजी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना हिंगोली या ठिकाणा लेखी निवेदनाद्वारे थोरावा ते सातेफळ कामा संदर्भात झालेल्या तफावतीची माहिती देण्यात आली होती पण सदरील कामा संदर्भात कुठलीही चौकशी झाली नसल्याचे संतोष गवळी यांच्याकडून सांगण्यात आले त्यानुसार मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला 16 सप्टेंबर पासून उपोषणाला सुरुवात केली आहे एकंदरीत रस्त्याच्या दोन्ही साईटच्या खदानी पाच फूट खोलीपर्यंत खोदून त्या ठिकाणी वरून मिळालेली माती खडक वापरूनच रस्त्याचे बांधकाम केले बाहेरील कुठलेही खडक मुरूम या ठिकाणी न आणल्याने सदरील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे एकंदरीत आज रोजी रस्त्याची परिस्थिती चार महिन्यानंतरच ठीक ठिकाणी खड्डे पाहायला मिळत आहेत तर डांबरीकरण करतेवेळी वापरण्यात आलेले डांबर हे व्यवस्थित नसल्याने खडीशी धरून डांबर दिसून येत नाही तर साईट पट्टीवरील मजबुती पाहायला मिळत नाही व रस्त्यालगत येणाऱ्या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे सिमेंट व स्टील न वापरल्यामुळे मजबुती व त्या कामावर वॉटरिंग न केल्याने आज फुलाची बांधकाम परिस्थिती ढासळत आहे .
त्यावरून संतोष गवळी यांनी गेल्या सात दिवसापासून आमरण उपोषणाला सुरुवात केली असता अद्याप कुठलाही प्रशासकीय शासकीय अधिकारी उपोषण स्थळी न गेल्याने उपोषण करते संतोष गवळी यांची मानसिक स्थिती बिघडली आहे मी सत्याचा मार्ग वापरत असतानाही शासकीय अधिकारी हे राजकीय लोकांच्या बळी दबा खाली येऊन योगी अशी चौकशी करत नसल्याचे दिसून येत आहे.






