Home बुलढाणा रविकांत तुपकर म्हणालेत.. बुलढाणा विधानसभा पूर्ण ताकदीने लढविणार! -अंगावर याल तर शिंगावर...

रविकांत तुपकर म्हणालेत.. बुलढाणा विधानसभा पूर्ण ताकदीने लढविणार! -अंगावर याल तर शिंगावर घेवू ! -मोताळ्यातील राजुर मध्ये झाली बैठक !

23
0

आशाताई बच्छाव

1000757258.jpg

रविकांत तुपकर म्हणालेत.. बुलढाणा विधानसभा पूर्ण ताकदीने लढविणार! -अंगावर याल तर शिंगावर घेवू ! -मोताळ्यातील राजुर मध्ये झाली बैठक !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- मोताळा तालुका आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेची ताकद आपल्याला पुन्हा एकदा दाखवून द्यायची आहे. सर्व कार्यकर्त्यांच्या भावना पाहता बुलढाणा विधानसभा निवडणूक आपल्याला पूर्ण ताकदीने लढवायची आहे, अशा विश्वासपूर्ण शब्दात रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्या पुढे विचार व्यक्त केले. १४ सप्टेंबर रोजी रविकांत तुपकरांच्या बुलढाणा विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर रविकांत
तुपकर यांनी प्रथमच बुलढाणा विधानसभा क्षेत्रातील

प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी

मोताळा व बुलढाणा तालुक्यातील सर्व प्रमुख

पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या

बैठकीत प्रथमतः लोकसभा निवडणुकीचा आढावा यावेळी घेण्यात आला. त्यानंतर रविकांत तुपकरांनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. लोकसभा निवडणुकीत बुलढाणा विधानसभा मतदारसंघात आपली परिस्थिती अत्यंत चांगली होती. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात जवळपास ३९ हजार मते आपल्याला अपक्ष असतांनाही मिळाली आहे. कोणतीही बॅनरबाजी नाही, प्रचाराचे पुरेपूर साहित्य नाही, वाहने नाही, पैसे नाहीत असे
असतांनाही घरच्या भाकरी खाऊन कार्यकर्त्यांनी जिवापाड मेहनत घेतली. कोणता नेता नाही की पाठीराखा नाही केवळ रविकांत तुपकर या एका चेहऱ्याकडे पाहून बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, शेतमजुर व सर्वसामान्य जनतेने जवळपास ३९ हजार मते देऊन मोठा विश्वास दर्शविला आहे. ही परिस्थिती पाहता बुलढाणा विधानसभा मतदारसंघ आपल्यासाठी अत्यंत अनुकूल आहे, त्यामुळे रविकांत तुपकर यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी जोरदार मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांनी रेटून धरली. जवळपास सर्वच पदाधिकाऱ्यांच्या भावना आणि मागणी एक समान दिसून आली. यावेळी बोलतांना
रविकांत तुपकर यांनी सांगितले की, सत्ता, संपत्ती आणि बळाचा वापर करून आपल्याला तोडण्याचा सातत्याने प्रयत्न झाला, त्याचा अनुभव अनेक आंदोलनांमध्ये आलाच शिवाय लोकसभा निवडणुकीत देखील आला. परंतु कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर, युवक आणि सर्वसामान्य जनतेचा भरघोस पाठिंबा आणि आशीर्वाद हीच माझी संपत्ती आणि हीच माझी खरी ताकद ठरली. शेतकऱ्यांसाठी व चळवळीसाठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तब्बल अडीच लाख मते देऊन सर्वसामान्य जनतेने आपली ताकद दाखविली आहे. सर्व कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी तन- मन-धनाने जीवाची बाजी लावून घेतलेली मेहनतच
आज मला लढण्याचे बळ देत आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांच्या भावनांचा मी आदर करतो. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवू असे, रविकांत तुपकर यांनी सांगितले. तुपकरांच्या या घोषणेचे सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करून स्वागत केले. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात ही बैठक पार पडली. त्यांच्या घोषणेने सर्वांमध्ये एक नवा जल्लोष भरल्याचे देखील दिसून आले.
• …तुपकरांना बुलढाण्यातून लढण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक
यावेळी रविकांत तुपकर यांनी लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. साम-दाम-दंड-भेद आणि सत्ता व पैशाच्या जोरावर सध्याचे वातावरण बिघडत आहे या परिस्थितीत भाऊ तुम्हीच पुरून उरू शकता म्हणून तुम्हीच उमेदवार पाहिजे असा, आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरला होता. यावेळी जनतेच्या ताकदीवर विधानसभा लढवू अशी घोषणा तुपकरांनी केली. आपण स्वतः उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार असे मात्र त्यांनी स्पष्ट सांगितले नाही. शेतकऱ्यांसाठी जीवाची बाजी लावून लढणारा, जन सामान्यांचाआवाज म्हणून काम करणारा तुमच्या मनातील चेहराच आपला उमेदवार राहील असे सांगत तुपकरांनी विधानसभेसाठी अप्रत्यक्षपणे दंड थोपटले.
• अंगावर याल तर शिंगावर घेवू – तुपकर

जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तसतसे सत्ताधारी पक्षातील नेते आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव वाढवीत असल्याचे दिसून येत आहे. कार्यकर्त्यांना विविध प्रकारचे आमिष दाखवले जात आहे, शिवाय धमक्या देऊन दादागिरी देखील केली जात असल्याचे कार्यकर्ते सांगत आहे. परंतु आम्हीही सत्तेची मस्ती आणि पैशाचा माज खपवून घेणार नाही, कुणीही अंगावर आले तर बिनधास्त शिंगावर घेवू, आम्ही शेतकऱ्यांचे बच्चे आहोत, लक्षात ठेवा, असा सज्जड इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.

Previous articleरायगड जिल्ह्यातील पेण येथे जश्न ए ईद मिलादुन्नबी उत्सवात साजरा
Next articleExclusive अखेर आमदार संजय गायकवाड यांच्यावर अ दखलपात्र गुन्हा दाखल !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here