Home भंडारा ८ वी दक्षिण आशियाई आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताला सुवर्णपदक

८ वी दक्षिण आशियाई आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताला सुवर्णपदक

111
0

आशाताई बच्छाव

1000753226.jpg

८ वी दक्षिण आशियाई आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताला सुवर्णपदक

भारतीय टीमची कर्णधार प्राची चटपचे सर्वत्र कौतुक

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी):- ८ वी दक्षिण आशियाई आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धा- २०२४ ला भूतान येथे नुकतीच पार पडली आहे. त्यात आट्यापाट्या फेडरेशन ऑफ इंडिया टीमची कर्णधार प्राची केशव चटप व टीमने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून दिनांक १५ सप्टेंबर २०२४ ला भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. त्याबद्दल सर्वत्र कौतुक करून अभिनंदन केले जात आहे.
महिलांचे प्रेरणा स्थान असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माॅ. जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राणी लक्ष्मीबाई इत्यादींचा आदर्श प्राची चटपने डोळ्यासमोर ठेवत. बाल वयापासूनच सामाजिक कार्याची व खेळाडू वृत्ती असल्याने शैक्षणिक अभ्यासाबरोबर महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाला महत्त्व दिले आहे. आणि पारंपरिक खेळ असलेला आट्यापाट्या (लोन) हा खेळ निवडला. गावातील जिल्हा परिषद शाळेत या खेळाचा योग्य सराव करून जिल्हा, विभाग व राज्यस्तर गाठला आहे. तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रिडा क्षेत्रात नाव लौकिक करण्यासाठी प्राचीने अनेकांना क्रिडाच्या प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने सदैव प्रयत्न करत आहे. तिने महाराष्ट्र राज्याची कर्णधार असतांना तीन सिल्व्हर मेडल मिळवून दिले आहेत. आणि आता ८ वी दक्षिण आशियाई आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धा- २०२४ ला भूतान येथे होऊ घातली आहे. त्यात आट्यापाट्या फेडरेशन ऑफ इंडिया टीमची कर्णधार म्हणून प्राची केशव चटप हीची निवड करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, भंडारा तालुक्यातील तिन हजार लोकसंख्या असलेल्या खमारी (बुटी) येथील भूमीहीन, निराधार दुर्गा केशव चटप यांची मुलगी प्राची आहे. प्राची तीन वर्षाची असतांना वडील केशव चटप यांचे निधन झाले. घरात अठराशेवीस द्रारिद्रय असतांना कुटुंबाचे पालन- पोषण करण्याची जबाबदारी आईवर आली. मात्र आईवडिलांच्या स्वप्नाला तडा जाणार नाही. म्हणून प्राचीने शिक्षणाबरोबर समाजकार्य व क्रिडा क्षेत्रात गावाचे नाव लौकिक करण्याचा निर्धार केला. ती खमारी ( बुटी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वर्ग १ ते ४ पर्यंत शिक्षण घेतले. नंतर ५ ते १२ वी पर्यंत बेलगाव येथील कस्तुरबा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे. इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत प्रथम प्राविण्य मिळवले. मात्र खेळाच्या सरावासाठी अपुरा वेळ मिळत होता. म्हणून बीएससी अभ्यासक्रमात प्रवेश न घेता बी.ए अभ्यासक्रम निवडला. विद्यापीठ शिक्षण घेतांंनी विद्यापीठ व सिनियर स्पर्धेत उत्तम कामगिरी बजावली आहे. प्राची आता भंडारा येथील जे. एम. पटेल महाविद्यालयात बी. ए. तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. प्राची ला ग्रीष्मकालीन नि:शुल्क संस्कार शिबिरात मिळालेल्या विविध तज्ञ मार्गदर्शकांच्या प्रेरणेने नव्याने बळ मिळाले आहे.

सामाजिक कार्य

ती पर्यावरण प्रेमी असुन पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रजातीच्या बि-बियाणे गोळा करून सीड बॅंक तयार करून पावसाळ्यापुर्वी सीडबॉल तयार करून रस्त्याच्या कडेला टाकत (फेकत) असते. व अन्य ठिकाणी वृक्षारोपण करत आहे. तसेच ऊन, वारा, हिमवर्षा किंवा कोणत्याही सण उत्सवाला कुंटुबासोबत न राहता देशाची सेवा करण्यासाठी डोळ्यात तेल घालून सदैव पाहरा देणा-या भारतीय सैनिकांना बहिणीची उणीव भासू नये म्हणून प्राची ” धागा शौर्य का राखी अभिमान की” या उपक्रमाअंतर्गत रक्षाबंधन ला राखी व
संदेश रूपीपत्र गेल्या आठ वर्षापासून कोबरा बटालियनच्या सैनिकांना पत्ररूपी संदेश व राखी बांधत आहे. तसेच भंडारा येथील शासकीय अंध विद्यार्थ्यांना व जिल्हा कारागृहात सुध्दा पोलीस बांधवांना राखी बांधून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

महाराष्ट्र संघ तीन सिल्व्हर पदकाने सन्मानित
प्रतिकूल परिस्थितीत प्राचीने खमारी गावाबरोबर जिल्ह्याचे नाव लौकिक केले आहे. अशाप्रकारे ग्रामीण भागातून नेतृत्व करत जिल्हयासह राज्यस्तरीय आट्यापाट्या क्रिडा क्षेत्रात प्राचीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत जिल्ह्याचे नाव लौकिक केले होते. त्यामुळे राष्ट्रीय खेळाडू म्हणून कु. प्राची चटप ची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली होती. व महाराष्ट्र संघाला व्दितीय क्रमांक तसेच फेडरेशन मध्ये महाराष्ट्र व पांडेचेरी तसेच केरळ येथे महाराष्ट्र संघाला व्दितीय क्रमांक पटकाविला आहे. यात महाराष्ट्र संघाला सिल्वर पदकाने गौरविण्यात आले आहे. अशा प्रकारे कामगिरी भंडारा जिल्ह्याच्या प्राची चटपने महाराष्ट्राचे नाव चमकविल्याने जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. तसेच विविध उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तिच्या कार्याची दखल घेऊन प्राची चा अनेक ठिकाणी गुणगौरव केला जात आहे. कु. प्राची केशव चटप हीने प्रतिकुल परिस्थितीचा सामना करून आट्यापाट्या खेळात प्राविण्य प्राप्त केले आहे. ती महाराष्ट्र चमूची कर्णधार असतांना महाराष्ट्र संघाला तीन सिल्वर पदक व अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. म्हणून तीची आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड करण्यात आली होती. याच माध्यमातून तीची ८ वी दक्षिण आशियाई आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धा- २०२४ ला भूतान येथे भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आट्यापाट्या स्पर्धेकरिता भारतीय टीम ची कर्णधार व टीमने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून भूटान, नेपाळ व श्रीलंका च्या संघाचा पराभव करून भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. त्याबद्दल भंडारा – गोंदिया जिल्ह्यातील नागरिक, क्रीडा क्षेत्रातील व महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सर्वत्र कौतुक करून अभिनंदन केले जात आहे.
प्राची चटपने आपल्या यशाचे श्रेय आट्यापाट्या फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. व्ही. डी. पाटील, आट्यापाट्या फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव डॉ. दिपक कवीश्वर, डॉ. अमरकांत चकोले, कोच व मार्गदर्शक श्याम देशमुख. संस्था सचिव डॉ. ललीत जीवानी, पुज्य सिंधी समाज अध्यक्ष जैकी रावलानी, जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे व आई दुर्गा चटप, ऑल इंडिया वर्किंग जनार्लिजमचे अध्यक्ष निशांतभाई यांना दिले असुन प्राची चटपचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार नाना पटोले, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजु कारेमोरे, जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक नूरूल हसन, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, जे. एम. पटेल महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. कार्तिक पन्निकर, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, क्रीडा शिक्षक डॉ. भिमराव पवार, रोमी बिष्ट, जिल्हा परिषद सदस्य रजनीश बन्सोड, समीर नवाज, रामबिलास सारडा, डॉ. गोपाल व्यास, भंडारा क्रीडा व युवक मंडळांच्या सर्व पदाधिकारी, खेळाडू तसेच जिल्ह्यातील खेळाडू व नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here