आशाताई बच्छाव
आडवीर येथील शेतकऱ्यांचा उपोषणाला आझाद हिंदचा जाहीर पाठिंबा..
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :-मोताळा तालुक्यातील आडविहीर गावातील गाववासियांना शेत रस्त्याचा पावसाळ्या मध्ये होतो त्रास
70 वर्षानंतर आजही शेतकऱ्यांना रस्त्यासाठी उपोषणाला बसावे लागते याहून दुर्दैव ते कोणते..?
मुसळधार पावसातही शेतकरी बांधव रस्त्यासाठी रस्त्यावर उपोषणाला बसले निषेधार्य बाब आहे.
आडविहिर ते महालपिंप्री जोड रस्त्यासाठी आडविहिर येथील शेतकरी 2 दिवसापासून शेत रस्त्यावर उपोषणाला बसले आहेत. शासन प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही.
संबंधित प्रशासनाने 24 तासाच्या आत सदर उपोषणाची व मागणीची दखल घ्यावी.
अन्यथा आझाद हिंद शेतकरी संघटना सदर आंदोलनात सहभागी होईल.
उपोषणाला आणि मागणीला आझाद हिंद शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा आहे.