आशाताई बच्छाव
बी.एन. कसबे यांना मान्यवरांच्या हस्ते संगीत भूषण पुरस्कार
जालना, दि. १९(प्रतिनिधी दिलीप बोंडे)- जालना येथील बी.एन. कसबे (संगीत विशारध गायन)
यांना छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमात संगीत भुषण पुरस्काराने
मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
जुना जालना येथील आयकर कॉलनी बी.एन. कसबे (संगीत विशारध गायन) यांना निळे
प्रतीत बहुउद्देशिय सेवाभावी संस्था व शिक्षण महर्षी माधवराव बोरडे
प्रतिष्ठाणच्या वतीने राज्यस्तरीय संगीत भूषण पुरस्कार छत्रपती संभाजीनगर
येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन व सांस्कृतिक सभागृह येथे १५ ऑगस्ट
रोजी मुंबई अंधेरी न्यायालयाचे न्यायाधीश विजयकुमार गवई व छत्रपती
संभाजीनगर येथील जेष्ठ साहित्यीक प्राचार्य डॉ. यशवंत खडसे, छत्रपती
संभाजीनगरचे सहायक पोलीस आयुक्त बालाजी सोनटक्के, पोलीस निरीक्षक गौतम
पातारे, महानगर पालिका उपायुक्त रविंद्र जोगदंडे यांच्या हस्ते प्रदान
करण्यात आला.
बी.एन. कसबे हे शासकीय सेवेत सक्रीय राहून देखील कलेची संगीत साधना
केलेली आहे. ती भावी पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. संगीत कलेच्या व
गायनाच्या माध्यमातून भावगीते, भक्तीगीते, पोवाडे, सुगम संगीत आदी
कलेव्दारे व हार्मोनिय, वादनातून सामाजिक प्रबोधन केलेले आहे. हे आपले
कार्य लक्षवेधी आहे. याव्दारे महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्षेत्राला बळ
देण्याची भुमिका आपल्या सारखे आघाडीचे कलाकार करत आहेत, त्यात आपला वाटा
मोलाचा आणि महत्वाचा आहे. फुले-शाहू-आंबेडकर, अण्णाभाऊसाठे, मुक्ता साळवे
आदी महापुरुषांच्या विचारातील आपली निष्ठा प्रशंसनिय असून समाजामध्ये
प्रबोधन व्हावे. या सद हेतूने आपल्या नव्या पिढीला संगीताचे धडे देत
आहात, हे कार्य उल्लेखनीय व नोंद घेण्यासारखे आहे. आपले कलेच्या
क्षेत्रातील योगदान व तपश्चर्या विचारात घेवून आपणास महाकवी वामनदादा
कर्डक