Home बुलढाणा ग्रा. कृ. कार्यानुभव अंतर्गत बीज प्रक्रिये बाबत प्रात्याक्षित

ग्रा. कृ. कार्यानुभव अंतर्गत बीज प्रक्रिये बाबत प्रात्याक्षित

109

आशाताई बच्छाव

1000655538.jpg

ग्रा. कृ. कार्यानुभव अंतर्गत बीज प्रक्रिये बाबत प्रात्याक्षित

ज्ञानेश्वर पाटील युवा मराठा न्यूज ब्युरो चीफ बुलढाणा:
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी महाविद्यालय, जळगाव जामोद येथिल विद्याथ्यांनी बिज प्रक्रिये संदर्भात जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव खुर्द या गावात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. बियाणे जमिनीत पेरणीपुर्वी जमिनीतुन किंवा बियाण्यातुन पसरणारे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच बियाण्याची उगवण क्षमता वाढवीण्यासाठी व रोपे सतेज आणि जोमदार वाढविण्यासाठी बियाण्यांवर वेगवेगळी जैविक व रसायनिक औषधांची प्रक्रिया करणे आवश्यक आहे. बीज प्रक्रिये का करावे हे पटवून देण्यासाठी कृषी महाविद्यालय जळगाव जामोद येथिल कृषिदूत अभिषेक पवार, सौरव पाटील, गौरव मापारी, मयूर मोहिते, संकेत देशमुख, आदित्य गारमोडे, खान रेहान कृषीदूतांनी प्रात्यक्षिकांचे आयोजन केले होते. यावेळी शेतकरी उपस्थित होते. यांनी गोनपाठ या सरळ व सोप्या पद्धतीने थोडक्यात समजावून सांगितले. सदर मार्गदर्शना करिता महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश गवई व कार्यक्रम अधिकारी श्री. अविनाश आटोळे आणि प्रा.कू विद्या कपले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले त्याचप्रमाणे गावातील इतर शेतकरी उपस्थित होते.

Previous articleइंडियन मेडिकल असोसिएशनसह (आयएमए) डॉक्टरांच्या संघटनांचा चाळीसगाव येथे 24 तासांचा बंद
Next articleपालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते इतर मागास बहुजन कल्याणच्या चित्ररथास हिरवी झेंडी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.