Home नांदेड पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते इतर मागास बहुजन कल्याणच्या चित्ररथास हिरवी झेंडी.

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते इतर मागास बहुजन कल्याणच्या चित्ररथास हिरवी झेंडी.

95

आशाताई बच्छाव

1000655543.jpg

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते
इतर मागास बहुजन कल्याणच्या चित्ररथास हिरवी झेंडी.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड दि. 18 : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने 15 ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडील योजनांची प्रचार व प्रसिद्धीसाठी तालुकास्तरावर मेळाव्याचे आयोजन करून योजनांची व्यापक स्वरूपात प्रसिद्धी करण्यात येत आहे. याअनुषंगाने भोकर येथे राज्याचे ग्रामविकास, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी फिरत्या चित्ररथास हिरवी झेंडी दाखवून 17 ऑगस्ट रोजी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर आदी उपस्थित होते.

इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडील योजनांची प्रचार व प्रसिद्धीचे आवाहन यावेळी करण्यात आले. इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक शिवानंद मिनगिरे, समाज कल्याण निरीक्षक आर. डी. सूर्यवंशी, माधव दौंड, अनिल कंधारे व महेश इंगेवाड हे उपस्थित होते.

Previous articleग्रा. कृ. कार्यानुभव अंतर्गत बीज प्रक्रिये बाबत प्रात्याक्षित
Next articleअंढेरा फाट्याजवळ ॲपे व रोहीच्या धडकेत महिला ठार चार जण गंभीर…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.