आशाताई बच्छाव
अंढेरा फाट्याजवळ ॲपे व रोहीच्या धडकेत महिला ठार चार जण गंभीर…
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
अंढेरा :- बुलढाणा आसोला ता चिखली येथील काही महिला व पुरुष हे आपल्या नातेवाईकांच्या नैवेद्यासाठीचा तांबोळा येथे कार्यक्रम आटपून असोला गावाकडे ॲपे नंबर mh 28 H 2723 ने सायंकाळी सहा वाजे दरम्यान परत येत असताना हा भीषण अपघत घडला.. सविस्तर असे की अंढेरा फाट्याजवळ चिखली रोडवर जंगलातून भरधाव आलेल्या रोहिनें या तीन चाकी ॲपे ल जोरात धडक देऊन अपेचा चकना चूर झाला त्यामध्ये बसलेले महिला व पुरुष ड्रायव्हर सह हे प्रवासी सर्वजण गंभीर जखमी झाले असून आप्पे अर्धवट पलटी झाल्याने त्यामध्ये लताबाई सुनील चव्हाण वय 32 वर्ष राहणार आसोला बु यांना गंभीर दुखापत झाल्याने हॉस्पिटलला नेत असताना ॲम्बुलन्स मध्ये त्यांचा मृत्यू झाला त्यांच्यासोबत गंभीर जखमी जिजाबाई देविदास चव्हाण व ड्रायव्हर बाळू भास्कर सुर्वे हे व त्यामध्ये असलेले चार ते पाच महिला ह्या सुद्धा जखमी झाले असून औंढेश्वर पतसंस्थेची ॲम्बुलन्स व नरेंद्र महाराज यांच्या संस्थेच्या या दोन्ही ॲम्बुलन्स ह्या अवघ्या पाच ते दहा मिनिटात घटनास्थळावर पोहोचून त्यांनी काही जखमींना चिखलीकडे रवाना केले व कॉन्ट्रॅक्टर पद्माकर दंडे यांनी सुद्धा आपल्या मालवाहतूक कॅम्पमध्ये एका जखमी महिलेला दवाखान्यामध्ये घेऊन जाण्यासाठी मदत केली. काही जखमी खाजगी रुग्णालयात चिखली या ठिकाणी उपचार घेत आहे त्यातील एक महिल गंभीर जखमी आहे. अपघात माहीत होताच चिखली कडे जाणारे दत्तकृपा स्ट्रोकरेषेचे मालक कॉन्टॅक्टर पद्माकरशेठ दंडे व संत ज्ञानेश्वर विद्यालय शिवानंद मांन्टे विष्णू वाघ पिंपरी व विशाल तेजनकर रवींद्र सानप ॲपे संघटनेचे सुशील इंगळे बंडू राठोड यांनी जखमींना मदत करण्याचे काम केले मांन्टे यांनी दोन्ही ॲम्बुलन्स यांना फोन करून तात्काळ या ठिकाणी बोलवल्याने जखमींना चिखलीला रुग्णालया त घेऊन जाण्यासाठी मदत झाली जबरदस्त धडक दिल्याने या अपेचा चकणाचुर झाला असून घटनास्थळावर रक्ताच्या थारोळ्यात या महिला पडल्या होत्या मात्र मदत करांनी मदत केल्यामुळे लवकर उपचार मिळाला हे विशेष वन विभागाने वन विभागाच्या हद्दीमध्ये प्राण्याचे फोटो लावून सूचनाफलक निर्माणकरून लावावे सदर प्रकरण मध्ये आजुन अंढेरा पोलीस स्टेशन मध्ये वृत्त प्रसारित होईपर्यंत गुन्ह्याची नोंदणी नव्हती…






