Home पुणे पिंपरी : ध्वजारोहण सुरु असताना आयुक्त शेखर सिंह यांच्या मोटारीवर हल्ला; दिव्यांग...

पिंपरी : ध्वजारोहण सुरु असताना आयुक्त शेखर सिंह यांच्या मोटारीवर हल्ला; दिव्यांग व्यक्तीने फोडली काच

112

आशाताई बच्छाव

1000651267.jpg

पिंपरी : ध्वजारोहण सुरु असताना आयुक्त शेखर सिंह यांच्या मोटारीवर हल्ला; दिव्यांग व्यक्तीने फोडली काच
पुणे ब्युरो चीफ: उमेश पाटील
पिंपरी : स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सुरु असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मोटारीची दिव्यांग व्यक्तीने काच फोडली. महापालिका प्रशासन दिव्यांग व्यक्तींना त्रास देत असल्याने मोटारीची काच फोडल्याचे अजय गायकवाड यांनी सांगितले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. राष्ट्रगीत झाल्यानंतर महाराष्ट्र गीत सुरू होते. त्याचवेळी अजय गायकवाड यांनी काटीच्या सहाय्याने आयुक्त सिंह यांच्या मोटारीची काच फोडली. पोलिसांनी तत्काळ गायकवाड यांना ताब्यात घेतले. चालकाने तत्काळ मोटार हलविली. ध्वजारोहण सुरू असताना घडलेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला होता. आयुक्त सिंह हे पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दुसऱ्या मोटारीने रवाना झाले. ‘अ’ क्षेत्रिय अधिकारी सुचेता पानसरे यांना महापालिकेत बोलवून घेण्यात आले आहे.अजय गायकवाड म्हणाले, की महापालिका प्रशासनाकडून दिव्यांग व्यक्तींना त्रास दिला जातो. मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत. मागील चार वर्षांपासून रमाबाई आवास योजनेत घर मागत आहे. परंतु, घर देण्यास टाळाटाळ केली जात आहे. अधिकारी टोलवाटोलवी करत आहेत. टपरीवर दोनवेळा अतिक्रमण कारवाई केली. याबाबत विचारले असता अ क्षेत्रिय अधिकारी सुचेता पानसरे या आयुक्तांनी दिव्यांग व्यक्तींना त्रास द्यायला सांगितले आहे असे उत्तर देतात. आम्हालाही देशाचा अभिमान आहे. परंतु, प्रशासन बहिरे झाले आहे. त्यामुळे आज स्वातंत्र्यदिनी हे पाऊल उचलले आहे. पोलिसांनी दालनात नेऊन मारहाण केल्याचा आरोपही त्यांनी केला.

Previous articleडॉ. तुषार गायकवाड यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
Next articleहॅप्पी स्ट्रीट चाळीसगाव २०२४ अभिनव उपक्रम संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.