Home जळगाव हॅप्पी स्ट्रीट चाळीसगाव २०२४ अभिनव उपक्रम संपन्न

हॅप्पी स्ट्रीट चाळीसगाव २०२४ अभिनव उपक्रम संपन्न

115

आशाताई बच्छाव

1000651542.jpg

हॅप्पी स्ट्रीट चाळीसगाव २०२४ अभिनव उपक्रम संपन्न

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील-
रोटरी परिवार चाळीसगाव व चाळीसगाव पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने हॅप्पी स्ट्रीट चाळीसगाव २०२४ हा एक अभिनव उपक्रम घेण्यात आला. आपले जुने पारंपारिक खेळ विसरून आपण सर्वजण मोबाईलच्या फार मोठ्या विळख्यात अडकल्याने *मोबाईल पलीकडचे आनंदी जग* ही संकल्पना पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या संकल्पनेतून सादर करण्यात आली.
मुलांना पारंपारिक खेळांचे ज्ञान व्हावे ते मुलांनी खेळावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी चाळीसगाव पोलीस स्टेशन च्या वतीने विविध शस्त्रांचे खुले प्रदर्शन ठेवले होते. मोबाईलचे दुष्परिणाम सांगणारे पथनाट्य, बॅडमिंटन, कत्थक नृत्य आदी पारंपारिक खेळांचे आयोजन केले होते.
चाळीसगाव शहरातील व तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयातील जवळपास १,५०० विद्यार्थ्यांनी यावेळी आपला सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी व आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले, या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहा.पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, मुख्याधिकारी सौरभ जोशी, माजी खासदार उन्मेष पाटील,प्रदीपदादा देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. गावातील जवळपास ८,००० नागरिकांनी उपस्थिती दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मधुकर कासार, प्रितेश कटारिया, किरण देशमुख, श्रीकांत मोरकर, निलेश पिंगळे यांच्यासह रोटरी कलब चे अध्यक्ष अनिल मालपुरे, सचिव निलेश शर्मा, रोटरी रॉयलचे अध्यक्ष स्वप्निल शिंदे, सचिव संदीप चव्हाण, क्रीडा विभागाचे एम.वाय.चव्हाण क्रिकेट क्लबचे राजेंद्र पाटील व सर्व रोटरी सदस्य, क्रीडा शिक्षक, शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, क्रिकेटपटू व पोलिस बांधव यांनी अनमोल सहकार्य केले. कार्यक्रमासाठी मुख्याधिकारी सौरभ जोशी, मा.खा.उन्मेष पाटील व प्रदीप देशमुख उपस्थित होते. सर्वांनी नृत्य करून व प्रत्येक खेळात भाग घेऊन हॅप्पी स्ट्रीट कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला.

Previous articleपिंपरी : ध्वजारोहण सुरु असताना आयुक्त शेखर सिंह यांच्या मोटारीवर हल्ला; दिव्यांग व्यक्तीने फोडली काच
Next articleपरळी – गंगाखेड मार्ग खोदल्याने नागरिकांचा जीव मुठीत धरून प्रवास – अँड.मनोज संकाये
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.