Home बुलढाणा चिखली तालुक्यातील सोनेवाडी येथील शेतकऱ्यांचे तलावाच्या सांडव्यात उपोषण..

चिखली तालुक्यातील सोनेवाडी येथील शेतकऱ्यांचे तलावाच्या सांडव्यात उपोषण..

100

आशाताई बच्छाव

1000650240.jpg

चिखली तालुक्यातील सोनेवाडी येथील शेतकऱ्यांचे तलावाच्या सांडव्यात उपोषण..
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
चिखली:- बुलढाणा सोनेवाडी येथील शेत रस्ता खुला करण्यासाठी अनेक वेळा निवेदने देऊनही रस्ता खुला न झाल्यामुळे सोनेवाडी येथील शेतकऱ्यांनी पाझर तलावाशेजारील शेतरस्ता खुला करून देण्यात यावा, यासह इतर मागण्यासांठी सोनेवाडी येथील शेतकरी महिला व पुरुषांनी ११ ऑगस्टपासून तलावाच्या सांडव्यातच बेमुदत उपोषण सुरू केले आहे.सोनेवाडी येथील पाझर तलावाच्या निर्मितीनंतर गट नं. १० मधील बुडीत क्षेत्रातील सांडव्याच्या वाहत्या दिशेने असलेला रस्ता जलसिंचन विभागाने प्रवाहाच्या बाहेरून सोनेवाडी ते पांगरी असा खुला करून द्यावा, ही सोनेवाडी येथील शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. हा रस्ता गट नंबर ९, १० व ११ मधून जातो. मात्र, हा रस्ता येथील एका महिलेने अडविल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे.रस्ता अडविणाऱ्या महिलेने २० ते २५ एकर शासकीय जमिनीवर ताबा केला असल्याचाही आरोप आहे. दरम्यान, रस्ता खुला करून देण्यासंदर्भाने तहसीलदारांचे आदेश असतानाही जलसंधारण विभागाकडून टाळाटाळ होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पाझर तलावाने बाधित होऊन सांडव्यात गेलेला सोनेवाडी ते पांगरी रस्ता सांडव्याशेजारून कायमस्वरूपी शेतकऱ्यांना खुला करून देण्यात यावा यासह अन्य मागण्यासाठी हे उपोषण सुरू आहे.