Home बुलढाणा . आ.डॉ. संजय कुटेंनी रुग्णवाहिका स्वतःच्या जिनिंग मध्ये आणून ठेवल्या… आणि आता...

. आ.डॉ. संजय कुटेंनी रुग्णवाहिका स्वतःच्या जिनिंग मध्ये आणून ठेवल्या… आणि आता निवडणुकीच्या तोंडावर ते बाहेर काढून रुग्णसेवा करणार?

98

आशाताई बच्छाव

1000650114.jpg

आ. डॉ. संजय कुटेंनी रुग्णवाहिका स्वतःच्या जिनिंग मध्ये आणून ठेवल्या… आणि आता निवडणुकीच्या तोंडावर ते बाहेर काढून रुग्णसेवा करणार?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- जळगाव जामोद विधानसभा निवडणूक जवळ आली आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. शेतकरी नेते प्रशांत डीक्कर यांनी आमदार संजय कुटे वर फेसबुक अकाउंट वरून खळबळजनक आरोप केला. आधीच रुग्णवाहिका स्वतःच्या जिनिंग मध्ये आणून ठेवल्या आणि आता निवडणुकीच्या
तोंडावर ते बाहेर काढून रुग्णसेवा करणार आहेत.. असा टोला डिक्करांनी लगावला आहे.

२४ मार्च २०२२ मध्ये आमदार संजय कुटे यांनी शासकीय फंडातून अॅम्बुलन्सची खरेदी केली होती, पण जवळपास २ वर्षे या अॅम्ब्युलन्स त्यांनी स्वतःच्या मालकीच्या श्री कोटेक्स जिनींगमधे मध्ये लावून ठेवल्या आहेत. आता निवडणूकीच्या तोंडावर या अॅम्ब्युलन्स जनतेसाठी उपलब्ध करणार आहे. ही आहे का यांची रुग्णसेवा ? जी त्यांच्या फायद्यासाठी ऐन निवडणूकीच्या तोंडावर चालू होते आणि जेव्हा सामान्य लोकांना गरज असते तेव्हा हे स्वतःच्या घरात लपवून ठेवतात.
विशेष म्हणजे हे आमदार स्वतः डॉक्टर आहेत, आमदार म्हणून तर हे कृत्य चुकीचंच आहे, परंतू स्वतः डॉक्टर असून हे कृत्य डॉक्टरी पेशाला काळिमा फासणारे आहे. आम्ही या कृतीचा जाहीर निषेध करतो असेही डिक्कर म्हणाले
एकीकडे मतदारसंघात अॅम्ब्युलन्स विना लोकांचा जीव जात असताना केवळ निवडणूकीच्या तोंडावर राजकीय स्टंट करण्यासाठी अॅम्ब्युलन्स स्वतःच्या मालकीच्या ठिकाणी लावण्याचं पाप आमदार कुटे यांनी केले आहे. त्यांच्या पापांचा घडा भरला असून आगामी विधानसभा निवडणुकीत जनताच त्यांना उत्तर देईल असे प्रशांत डिक्कर म्हणाले.

Previous articleअंढेरा येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलिस उपनिरीक्षक ‘सुरेश जारवाल’ विशेष सेवा पदकाने सन्मानित..!
Next articleचिखली तालुक्यातील सोनेवाडी येथील शेतकऱ्यांचे तलावाच्या सांडव्यात उपोषण..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.