Home बुलढाणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला तर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना राखी...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला तर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना राखी बांधून …लाडक्या बहिणीने मानले सरकारचे आभार..

87

आशाताई बच्छाव

1000650088.jpg

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला तर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना राखी बांधून …लाडक्या बहिणीने मानले सरकारचे आभार..
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- बुलढाणा रक्षाबंधनाची ओवाळणी भेट भाऊ माझ्या बॅक खात्यात जमा झाली.. मुख्यमंत्री भाऊप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला आणि केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांना प्रत्यक्ष राखी बांधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं स्वागत केलंय …

महाराष्ट्रातील महिलांना स्वालंबी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील भाजप शिवसेना राष्ट्रवादी युतीच्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आहे ..या योजने अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले होते रक्षाबंधनाच्या सणापूर्वीच महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे . मुख्यमंत्रीभावा प्रती आदरव्यक्त करत एकनाथराव शिंदे यांच्या प्रतिमेला राखी बांधून ओवाळणी करून कृतज्ञता व्यक्त केली मेहकर येथे झालेल्या कृतज्ञता सोहळ्याला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते यावेळी महिलांनी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनाही राखी बांधून सरकारप्रती आभार व्यक्त केले या कृतज्ञता सोहळ्याला सोनताई वायाळ शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख माया म्हस्के वैशालीताई सावजी अक्काताई गायकवाड यांच्यासह बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या

Previous articleयुवा ग्रामीण पत्रकार संघाची आढावा बैठक संपन्न.
Next articleअंढेरा येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलिस उपनिरीक्षक ‘सुरेश जारवाल’ विशेष सेवा पदकाने सन्मानित..!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.