Home जालना भोकरदन मतदार संघात डॉ.सौ.सुरेखाताई लहाने यांचे भावी आमदार म्हणुन झळकले बॅनर.

भोकरदन मतदार संघात डॉ.सौ.सुरेखाताई लहाने यांचे भावी आमदार म्हणुन झळकले बॅनर.

420

आशाताई बच्छाव

1000620861.jpg

भोकरदन मतदार संघात डॉ.सौ.सुरेखाताई लहाने यांचे भावी आमदार म्हणुन झळकले बॅनर. तालुका प्रतिनिधी जाफराबाद-मुरलीधर डहाके दिनांक 07/08/2024
सविस्तर वृत्त असे की, भोकरदन मतदारसंघात भोकरदन व जाफराबाद असे दोन तालुके येतात. या दोन तालुक्यांमध्ये डॉक्टर सौ. सुरेखाताई संजयजी लहाने यांनी गावांगावामध्ये जाऊन संवाद रॅली द्वारा विविध गावांना भेटी देत मतदारसंघातील मतदारांशी संवाद साधत आहेत. या भेटीदरम्यान मतदारसंघातील गावागावातून त्यांचे भावी आमदार म्हणून आतापासूनच बॅनर झळकतांना दिसून येत आहेत. गावात जाऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधत आहेत. त्यांच्या या संवाद यात्रेला मतदारसंघातील मतदारांचा फार मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
भोकरदन -जाफराबाद मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फार मोठा बदल दिसून येणार असल्याची प्रतिक्रिया उमटल्या आहेत.बदल हि काळाची गरज असल्याचे मत मतदारांनी व्यक्त केले आहे.मतदारसंघात मतदारांनी स्वयंस्फूर्तीने अनेक गावात डॉ सुरेखा लहाने यांचे बॅनर लावल्याचे दिसून आले आहे.

Previous articleमाहोरा येथे छत्रपती शिवाजीमहाराज चौकात ॲड प्रकाश आंबेडकर यांचे स्वागत.
Next articleयुवा मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वप्निल देशमुख यांचा अंगणवाडी सेविकांच्या वतीने सत्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.