आशाताई बच्छाव
माहोरा येथे छत्रपती शिवाजीमहाराज चौकात ॲड प्रकाश आंबेडकर यांचे स्वागत.
जाफराबाद तालुका प्रतिनिधी- मुरलीधर डहाके
दिनांक 07/08/2024
सविस्तर वृत्त असे की, दिनांक 6 ऑगस्ट रोजी प्रकाश आंबेडकर यांनी काढलेली आरक्षण बचाव यात्रा माहोरा येथून जात असतांना छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रकाश आंबेडकर यांचे ढोल ताशांच्या गजरात वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांनी स्वागत केले .त्यानंतर अडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थितांना जास्तीत जास्त संख्येने जालना येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला कार्यकर्त्या खूप मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यानंतर ते जाफराबाद येथिल सभे साठी निघून गेले.






