आशाताई बच्छाव
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने पिंपळगाव रेणुकाई ग्रामपंचायतला दिले दारूबंदीचे निवेदन
तालुका प्रतिनिधी जाफराबाद -मुरलीधर डहाके
दिनांक 07/ 08/2024
सविस्तर वृत्त असे की दिनांक 7 ऑगस्ट रोजी भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील देशी-विदेशी दारू बंद करावी तसेच गावातील देशी दारूचे दुकान
व बार गावापासून दोन किलोमीटर अंतरावर हटविण्यात यावे याकरिता अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री वसंतराव देशमुख व प्रदेश कार्याध्यक्ष श्री मुरलीधर डहाके यांच्या नेतृत्वाखाली पिंपळगाव रेणुकाई येथील ग्रामसेवक एस. बी .साळवे व सरपंच संतोष बोर्डे ,पोलीस पाटील गजेंद्र निकम उपसरपंच गणेश कडुबा देशमुख यांना
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती च्या वतीने आज पिंपळगाव रेणुकाई येथे दारू चे दुकाने व बार गावापासून दोन किलोमीटर अंतरावर हठविण्यात यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे ग्रामपंचायतला देण्यात आली आहे. ग्रामविकास अधिकारी व सरपंच पोलीस पाटील यावेळी हजर होते. जर निवेदनाची दाखल न घेतल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा आखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समिती जालना जिल्ह्याच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी निवेदन देण्यासाठी प्रदेश कार्यध्यक्ष मुरलीधर डहाके, जालना जिल्हाध्यक्ष कृष्णा लहाने , उपजिल्हा अध्यक्ष शालीकराम आहेर ,दिव्यांग जालना जिल्हाध्यक्ष बबनराव लहाने ,भोकरदन तालुका अध्यक्ष बाळासाहेब देशमुख ,उप तालुकाध्यक्ष सुनील उंबरकर, ज्ञानेश्वर नरवाडे ,पुंडलिक शिंदे, हरीश सपकाळ ,नंदकिशोर सास्ते, व महिला जिल्हा अध्यक्ष ज्योतीताई बोर्डे ,भोकरदन तालुका अध्यक्ष रूपाली अंकुळनेकर, भोकरदन तालुका उपाध्यक्ष अरुणा हिवरे, तालुका सचिव मुक्ता मोरे संपर्क प्रमुख मंजुषा सपकाळ ,शाखा अध्यक्ष वंदना पाटील , शाखा अध्यक्ष महिला आघाडी मोहळाई, कल्पना सोनवणे संपर्कप्रमुख महिला आघाडी भोकरदन ,मोरे तालुका सचिव महिला आघाडी भोकरदन ,शांताबाई मस्के शहर प्रमुख महिला आघाडी भोकरदन आदी उपस्थित होते.






