आशाताई बच्छाव
लाडकी बहीण योजनेचे पैसे 15 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होणार.
माहोरा येथे एकुण 800 अर्ज मंजूर तर 130 नामंजूर.
तालुका प्रतिनिधी जाफराबाद-मुरलीधर डहाके दिनांक06/08/2024
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत सुरुवातीला 15 जुलै होती. मात्र, अंगणवाडी सेविका मुठे मॅडम वाघ मॅडम हिवाळे मॅडम ग्रामपंचायत ऑपरेटर विकास जाधव सेतू केंद्र रामेश्वर शेळके यांनी एकुण जवळपास .800 च्या वर अर्ज भरले आहे .या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती. आतापर्यंत ज्या महिलांचे अर्ज भरून झाले आहेत, त्यावरुन तात्पुरत्या पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. तर 8ऑगस्टला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे 14 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु होईल. साधारण 15 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व महिलांना ही रक्कम मिळेल. ऑगस्ट महिन्यानंतर पुढे दर महिन्याच्या 15 तारखेला महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपयांची रक्कम जमा होईल.
अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे आधारकार्ड , रेशनकार्ड , उत्पन्नाचा दाखला , रहिवासी दाखला , बँक पासबुक , अर्जदाराचा फोटो, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, लग्नाचे प्रमाणपत्र,
चौकट
अनेक महिलांचे आधारला बँक खाते लिंक नाही आधार टि. सी. बँक खाते नावामध्ये सारखे नसल्यामुळे माहोरा येथील एकुण 130 अर्ज नामंजूर झाले आहे जे नामंजुर अर्ज आहे त्यांचे नव्याने पडताळणी करून त्यांना लाभ मिळण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत आणि कोणतीच महिला या योजने पासुन वंचीत राहणार नाही अशी हमी देत असल्याचे सेतू सुविधा केंद्र चालक रामेश्वर शेळके यांनी सांगितले .






