आशाताई बच्छाव
जाफराबाद येथे नायब तहसीलदार पदी पदोन्नतीने श्री.डी.डी. गोत्राणे रुजू
जाफराबाद तालुका प्रतिनिधी- मुरलीधर डहाके
दिनांक 06/08/2024
सविस्तर वृत्त असे की, जाफराबाद तहसील कार्यालयामध्ये श्री. डी. डी .गोत्राने हे नायब तहसीलदार म्हणून नव्याने रुजू झाले आहे. ते या अगोदर मंडळ अधिकारी होते. प्राथमिक माहिती नुसार ते आता संजय गांधी निराधार मध्ये काम पाहणार आहेत. त्यांच्या या निवडीने गोर गरीबांचे कामे होण्यास मदत होईल.विशेष म्हणजे डि.डि.गोत्राणे हे याअगोदर मंडळ अधिकारी म्हणून काम करत असल्याने त्यांना गोर- गरीब, सर्वसामान्य जनतेच्या अडिअडचणींची जाण असल्याने सर्वांना कामांच्या माध्यमातून न्याय देतील अशी अपेक्षा नागरिकांनी केली आहे.त्यांनी जाफराबाद तालुक्यातील जनतेचे कामं करावेत हीच अपेक्षा जाफराबाद तालुक्यातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. श्री डी.डी. गोत्राने यांच्या या निवडीचे माहोरा येथील ग्रामपंचायत कर्मचारी श्री लक्ष्मण वाघ, सोमनाथ पन्हाळे व अंकुश जाधव टेलर, पिंपळगाव कड येथील सरपंच श्री. संदीप माजादे या सर्वांनी त्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले . त्यांच्या या पदोन्नतीचे जाफराबाद तालुक्यातून स्वागत करण्यात आले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






