Home बुलढाणा दखल! ‘ युवा मराठा’ची बातमी उमटताच ठाणेदारांना निवेदन ! – काय आहे...

दखल! ‘ युवा मराठा’ची बातमी उमटताच ठाणेदारांना निवेदन ! – काय आहे प्रकरण बघाच..

92

आशाताई बच्छाव

1000610219.jpg

दखल! ‘ युवा मराठा’ची बातमी उमटताच ठाणेदारांना निवेदन ! – काय आहे प्रकरण बघाच..
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
देऊळगाव राजा :- बुलढाणा गिरोली खुर्द येथील श्रीकृष्ण व गोसंवर्धन ट्रस्ट मधून ७ गायी व एक गोरा अज्ञात चोरट्याने लंपास केल्याच्या पार्श्वभूमीवर ‘आता पशुधन कत्तलखान्याच्या मार्गावर’ अशी बातमी ‘ युवा मराठा’वर उमटताच भारतीय जनता पक्षाने
ठाणेदार संतोष महल्ले यांना या पशुधनाचा तात्काळ तपास करावा असे निवेदन दिले आहे.
गिरोली खुर्द येथील श्रीकृष्ण व गोसंवर्धन ट्रस्ट मधून ७ गायी व एक गोरा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. हे पशुधन कत्तलखानाकडे गेले असावे अशी शंका भारतीय जनता पक्षाने उपस्थित केली. या प्रकरणाचा तातडीने तपास करावा अशा मागणीची निवेदन ठाणेदारांना देण्यात आले आहे. निवेदनावर शहराध्यक्ष संजय तिडके, दादा, प्रवीण धंन्नावत, सचिन व्यास, मनीष अग्रवाल, निलेश वनवे, आदर्श, आशिष भालेराव, महेश मुळे, गणेश, सुरज हनुमंते आदींची स्वाक्षरी आहे.

Previous articleबुलढाणा जिल्हा परिषदेच्या कर्मचारी महिलेचं टोकाचं पाउल ; का संपवलं जीवन ?
Next articleपिंप्रीगवळी ते टाकळी घडेकर रस्त्याने होत आहे विद्यार्थ्यांसह नागरिकांचे प्रचंड हाल—
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.