Home भंडारा टेकेपार/माडगी येथील डांबरी रस्ता बनलाय पांदन रस्ता रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करा...

टेकेपार/माडगी येथील डांबरी रस्ता बनलाय पांदन रस्ता रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करा – चिराग चेटूले

117

आशाताई बच्छाव

1000606283.jpg

टेकेपार/माडगी येथील डांबरी रस्ता बनलाय पांदन रस्ता

रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करा – चिराग चेटूले

स्थानिक प्रशासन, ठेकेदार मस्त, गावकरी जनता त्रस्त

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) तालुक्यातील धारगाव जिल्हापरिषद क्षेत्रातील टेकेपार/माडगी येथील डांबरी रस्त्याचे व गावाच्या बाहेर असलेल्या दोन्ही मोरीचे बांधकाम गेल्या चार महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एका ठेकेदाराला देण्यात आले. गावाच्या दोन्ही बाजूला मोरीचे काम पूर्ण झाले असे ठेकेदाराने दाखवून त्यावर फक्त वरवर मुरूम टाकून, योग्य पद्धतीने दबाई न करता तेथे मातीचे ढीगार टाकले, त्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या- जाणाऱ्या नागरीकाना खुप मनस्ताप व त्रास होत आहे, रस्त्यावर चिखल आणि मोठे मोठे खड्डे पडले आहेत तसेच ग्रामपंचायतने लक्ष देऊन ठेकेदारला काम पूर्ण करुण देण्यास भाग पाडावे अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा शिवसेना प्रमुख धारगाव क्षेत्र श्री. चिराग चेटुले यांनी दिला आहे.

गावाच्या दोन्ही बाजूला असलेल्या मोरीवरून लाखनी व भंडाराकडे गावातील सर्वच जनता व इतर गावातील बरीच जनता, शाळकरी मुले, शेतकरी ये-जा करत असतात, असं असून सुद्धा गेल्या चार महिन्यापासून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक गाड्यांचे नुकसान झालेत तसेच रस्त्याने सायकलने सुद्धा जाणे जिवावर बेतण्याच्या पलिकडे असताना सुद्धा कुणीही याकडे लक्ष देत नाही त्यामुळे जनता वैतागली असून दाद कुठे मागायचा ? असा प्रश्न जनतेसमोर निर्माण झालं आहे कारण संबंधित ठेकेदार कुठला आहे, कोणाला काम करण्याची परवानगी आहे याची कुणालाच माहिती नाही. त्यामुळे ” स्थानिक प्रशासन, ठेकेदार मस्त व गावकरी जनता त्रस्त”.

*मनोगत*

टेकेपार/माडगी गावातील जनतेवर होणारा अन्याय सहन करणार नाही तसेच ग्रामपंचायत ने याकडे गांभीर्याने लक्ष देवून संबंधित ठेकेदाराला काम लवकर पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पातळीवर प्रयत्न करावे, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल याची सर्व जबाबदारी स्थानिक प्रशासन व ठेकेदाराची असेल.

चिराग चेटूले, शिवसेना धारगाव क्षेत्र प्रमुख

Previous articleआमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याचा मृत्यू.
Next articleलोकहो,वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासा –राहुल डोंगरे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.