Home भंडारा शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था खराशी व कहालकर दुःखनिवारक दवाखाना भंडारा व...

शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था खराशी व कहालकर दुःखनिवारक दवाखाना भंडारा व जिल्हा लोकमत समूह यांच्या वतीने शिक्षण विस्तार अधिकारी डमदेव कहालकर यांचा शाल ,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सेवानिवृत्ती सत्कार…

267

आशाताई बच्छाव

1000597715.jpg

शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था खराशी व कहालकर दुःखनिवारक दवाखाना भंडारा व जिल्हा लोकमत समूह यांच्या वतीने शिक्षण विस्तार अधिकारी डमदेव कहालकर यांचा शाल ,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सेवानिवृत्ती सत्कार…

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) आज दिनांक 31 जुलै 2024 ला शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था खराशी व कहालकर दुःख निवारक दवाखाना भंडारा ,लोकमत समूह कार्यालय भंडारा, यांच्या वतीने भंडारा जिल्हा परिषद चे शिक्षण विस्तार अधिकारी डमदेव कहालकर यांचा सेवानिवृत्ती सत्कार शाल ,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. त्याचप्रमाणे त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त जिल्हा परिषद मधील सफाई कर्मचाऱ्यांचा शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .त्याचप्रमाणे जेवणाचे डबे सुद्धा देण्यात आले. डॉ.अक्षय कहालकर साई मंदिर समोर भंडारा येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या हस्ते व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे भंडारा जिल्हा प्रभारी डॉ अक्षय कहालकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे लोकमत कार्यालय भंडारा येथे लोकमतचे भंडारा जिल्हा प्रतिनिधी मांडवकर यांच्या उपस्थितीत लोकमत कार्यालयात शाल ,श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला ,यावेळी विलास गोंधळे जिल्हा समन्वयक ,प्रकाश काळे प्रोग्रामर ,सुशील काणेकर ,मनोज धावडे वरिष्ठ लिपिक, देवानंद नंदेश्वर लोकमत पत्रकार ,कटकवार लोकमत प्रतिनिधी इस्तारीजी कहालकर, डॉ. जी.टी. टेंभेकर ,भाऊराव हटवार, पंकज कहालकर, अनिकेत कायते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ .अक्षय कहालकर यांनी केले.