आशाताई बच्छाव
आ. कैलास गोरंट्याल यांच्या उपस्थितीत
ग्रामीण अल्पसंख्यांक पदाधिकार्यांची बैठक
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) ः जालना मतदार संघातील ग्रामीण अल्पसंख्यांक पदाधिकार्यांची आ. कैलास गोरंट्याल यांनी बैठक घेवून विविध विकास कामांसंदर्भात चर्चा करून जास्तीत जास्त विकास कामे तात्काळ पुर्ण कसे केल्या जातील याकडे सर्व पदाधिकारी – कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवावे अशा सुचना दिल्या आहेत.
या बैठकीला जि. प. सदस्य रउफभाई परसूवाले, देवमूर्तिचे सरपंच अयूब भाई, सिंधीकाळेगावचे उपसरपंच रशिद भाई, सैयद मुंशी, अल्पसंख्यंक जिल्हाध्यक्ष अब्दुल रफीक, हमीद शेख, शमीम कुरेशी, वाहब भाई तसेच मजरेवाडी, देवमूर्ती, सिंधीकाळेगाव, राममूर्ती या ठिकाणचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.