आशाताई बच्छाव
पवनी ते शिवनाळा बस सुरू करा –
आगार व्यवस्थापक पवनी यांना निवेदन सादर
गरीब ,होतकरू मुलांना शाळेपासून राहावे लागत आहे वंचित
विद्यार्थ्यांची शैक्षणिक भरपाई कोण करणार?
संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी )पवनी तालुक्यातील पवनी ते जुनोना ही बस सेवा अचानक बंद झाल्यामुळे जुनोना, शिवनाला ,वलनी ,मांगली येथील मुले पवनी येथे शिक्षण घेण्याकरता येत असतात. परंतु शाळा सुरू होऊन पंधरा दिवस झाले परंतु शिवनाळा ते पवनी बस बंद झाल्यामुळे मुले शाळेत पोहोचू शकत नाही .परिणामी या मार्गावर बस सुरू करण्याची मागणी होत आहे. विद्यार्थी व पालक रोटी सोडून ज्यांच्याकडे दुचाकी वाहने आहेत ते पालक आपल्या पाल्याला पवनी येथील शाळेत नेऊन देतात. ही सर्व गावे पवनी पासून९ ते १२ किलोमीटर अंतरावर आहेत .बस शिवाय गोरगरिबांची मुले शाळेत जाऊ जाऊ शकत नाही .त्यामुळे बस तात्काळ सुरू करण्यात यावी. याबाबत सरपंच सुभाष खंडाळे यांनी आगारात जाऊन पवनी येथील बस व्यवस्थापक यांना निवेदन सादर केले. परंतु अद्याप कोणतेही कारवाई झाली नसल्याचे दिसून येत आहे. बस सेवा पूर्ववत सुरू करून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे .विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असताना परिवहन महामंडळ किंवा जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष का करीत आहे ? ही बस सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी असे मागणी सरपंच सुभाष खंडाळे, उपसरपंच द्रोणाचार्य बावनकर,ग्रामपंचायत सदस्य मंगेश कोसेकर ,संदीप बावनकर, युवराज बावनकर युवराज सावरबांधे ,गावकरी, पालकांनी ,विद्यार्थ्यांनी केलेली आहे.