आशाताई बच्छाव
भंडारा विश्राम भवन येथे भीम आर्मी ची जिल्हा संघटनात्मक बैठक संपन्न
संजीव भांबोरे
भंडारा,( जिल्हा प्रतिनिधी) आज दिनांक 17 जुलै 2024 ला भंडारा जिल्हा भीम आर्मी ची संघटनात्मक आढावा बैठक भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष विक्रांत भालाधरे यांच्या अध्यक्षतेखाली विश्राम भवन भंडारा येथे घेण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष चालक-मालक संघटनेचे अमित गोस्वामी, जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर भास्कर सुखदेवे ,मार्गदर्शक परमानंद मेश्राम, शरद भाऊ खोब्रागडे जिल्हा संघटक ,ग्रामीण तालुकाध्यक्ष अश्विन गोस्वामी, तालुका उपाध्यक्ष निहाल गजभिये ,नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष धम्मानंद रामटेके, भंडारा शहराध्यक्ष सुरज डोंगरे , व असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते .यावेळी भीम आर्मीची संघटन वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली. व नवीन पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली.