Home माझं गाव माझं गा-हाणं लोणवाडे गावातही कोरोनाचा शिरकाव,एकाच कुटूंबातील पंधरा जण केलेत क्वारंटाईन ….!!*

लोणवाडे गावातही कोरोनाचा शिरकाव,एकाच कुटूंबातील पंधरा जण केलेत क्वारंटाईन ….!!*

205
  • *लोणवाडे गावातही कोरोनाचा शिरकाव,एकाच कुटूंबातील पंधरा जण केलेत क्वारंटाईन ….!!* मालेगांव (सतिश घेवरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)- नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यात असलेल्या लोणवाडे गावातही आता कोरोनाचा शिरकाव झालेला असून,त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.चाळीसगाव फाटयावर असलेले लोणवाडे हे गाव मालेगाव तालुका पोलिस स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर असूनही तेथे कोरोनाचा रुग्ण आढळल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.लोणवाडे येथील प्रतिष्ठित शेतकरी व तालुक्याच्या राजकारणात सक्रीय असलेल्या व्यक्तीलाच कोरोनाची लागण झाल्यामुळे प्रशासनाकडून या शेतकऱ्यांच्या कुटूंबातील पंधरा व्यक्तींना क्वारटांईन करण्यात आले आहे.तर लोणवाडे ग्रामपंचायतीकडून ग्रामसेवक पवार यांनी संपूर्ण गावात फवारणी केली आहे.
Previous articleपारनेरच्या तहसीलदार सौ.ज्योती देवरे यांचा मनमानी करीत असल्याचा तलाठयांचा आरोप…!
Next articleलग्नाच्या खर्चातून ५१ हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.