आशाताई बच्छाव
पहेला ते निमगाव रस्त्याचे डांबरीकरण करा याकरिता भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांना निवेदन
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )पहेला ते निमगाव हे तीन किलोमीटरचे डांबरीकरण असलेला रस्ता पूर्णपणे उघडलेला असून ठीक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत . त्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात बारीशमध्ये पाणी साचत असतो त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या जनतेला खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. त्याचप्रमाणे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो .प्रसंगी अपघात होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही .त्यामुळे या रस्त्याचे पुन्हा नवीनीकरण करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे यांनी भंडारा गोंदिया लोकसभेचे खासदार प्रशांत पडोळे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पहेला येथील ग्रामपंचायत मध्ये त्यांना निवेदन देण्यात आले. खासदार साहेब याकडे लक्ष देतात की काय याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे.