Home भंडारा ई पास मशीन मुळे रास्त भाव दुकानदारांना मानसिक व शारीरिक त्रास बिन...

ई पास मशीन मुळे रास्त भाव दुकानदारांना मानसिक व शारीरिक त्रास बिन पगारी फुल अधिकारी

174

आशाताई बच्छाव

1000540684.jpg

ई पास मशीन मुळे रास्त भाव दुकानदारांना मानसिक व शारीरिक त्रास बिन पगारी फुल अधिकारी

हा तर दुकानदारांना आत्महत्याकडे प्रवृत्त करण्याचा मार्ग –संजीव भांबोरे

 

भंडारा -सरकारी रास्त भाव दुकानदारांना नवीन ई पास मशीन देण्यात आल्या. परंतु सर्वर बरोबर चालत नसल्यामुळे कार्डधारकांचे फिंगर प्रिंट घेताना दुकानदारांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असून हे दुकानदार बिन पगारी फुल अधिकारी आहेत. एक व्यक्तीच्या अंगठा घेण्याकरता अर्धा तास दुकानदारांना वाट पाहावी लागत आहे. याच्या फटका दुकानदारांना बसून तो आत्महत्याकडे प्रवृत्त होऊ शकतो .ज्या कॉन्ट्रॅक्टदाराला या मशीनच्या ठेका देण्यात आलेला आहे त्यांनी सर्वर बाबत बरोबर काळजी घ्यावी .यापूर्वी जी जुनी पास मशीन होती तिला एकच सिम कनेक्ट परंतु अशाप्रकारे त्रास देत नव्हती . परंतु आता रास्त भाव दुकानदारांना देण्यात आलेल्या नवीन मशीनला दोन सिम कनेक्ट आहेत. परंतु त्रास मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. याकडे कॉन्ट्रॅक्टदाराने लक्ष केंद्रित करून दुकानदारांच्या समस्यांचे निराकरण करावे अशी मागणी सरकारी स्वस्त धान्य दुकानदार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी एका पत्रकाद्वारे केलेली आहे.

Previous articleअखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या धसक्याने एसटी वाहतूक धामणगाव शहरातून पूर्ववत सुरू.
Next articleआता “हॅलीड्रोन” ने होणार शेतात फवारणी सेंदूरवाफात प्रात्यक्षिक सादर करीत केले ड्रोन वितरीत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.