आशाताई बच्छाव
मुंबई गोवा महामार्गावर जीव घेणे खडीने खड्डे भरण्याची अनोखी मोहिम सुरु
युवा मराठा न्यूज रायगड ब्युरो चीफ :- मुजाहीद मोमीन
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर महाड पासून माणगाव पर्यंत रस्त्यावर पडलेले खड्डे खडीने भरण्याची अनोखी मोहीम चालू असून या जीवघेण्या खड्ड्यांमुळे पुन्हा एकदा अपघात होऊन प्रवाशांचे नाहक बळी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लाख पाले टेमपाले व लोणेरे येथे आज पाऊस नसल्याने खड्डे भरण्याची मोहीम चालू होती मात्र खड्डे भरत असताना डंपर मधून खडी मिश्रित माती खड्डे पडलेल्या रस्त्यावर ढकलून खड्डे भरण्याचे अनोखे मोहीम चालू असल्याचे चित्र पाहण्यास मिळत होते.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग असताना या ठिकाणी पडलेले खड्डे डांबर मिश्रित खडीच्या साह्याने भरणे आवश्यक असताना या ठिकाणी पडलेले खड्डे केवळ खडीमिश्रित माती टाकून भरण्याचे काम करून केवळ सोपस्कार पार पाडण्याचे उद्योग राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांच्या वरदहस्थामुळे ठेकेदार कंपनी करीत असल्याचे चित्र राष्ट्रीय महामार्गावर पाहण्यास मिळत होते याबाबत राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी अथवा संबंधित कंपनीचे ठेकेदार अथवा त्यांचे प्रतिनिधी देखील हजर नसल्याने डंपर मधून माती मिश्रित खडी रस्त्यावरील खड्ड्यावर टाकून खड्डे भरण्याचे काम मजूर करीत होते वास्तविकता डांबर मिश्रित खडीने खड्डे भरून त्यावरती रोलिंग करून खड्डे भरण्याची प्रक्रिया असताना या सर्वांना फाटा मारून राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे भरण्याची अनोखी मोहीम चालू असल्याने महामार्गावरील खड्डे प्रवाशांच्या जीवावर भेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे