Home अमरावती पश्चिम विदर्भातील वास्तव: ६ महिन्यात ५५७ शेतकऱ्यांनी ओढला मृत्यूचा फास: अस्मानी, सुलतानी...

पश्चिम विदर्भातील वास्तव: ६ महिन्यात ५५७ शेतकऱ्यांनी ओढला मृत्यूचा फास: अस्मानी, सुलतानी संकटाचे रोज तीन बळी

111

आशाताई बच्छाव

1000535338.jpg

पश्चिम विदर्भातील वास्तव: ६ महिन्यात ५५७ शेतकऱ्यांनी ओढला मृत्यूचा फास: अस्मानी, सुलतानी संकटाचे रोज तीन बळी
दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या पश्चिम विदर्भात होत आहे. यंदाच्या सहा महिन्यात म्हणजेच जून अखेर ५५७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कंवटाळले. यामध्ये सर्वाधिक १७० शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झालेला आहे. शासन प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दर दिवशी ३ शेतकरी अस्मानी सुलतान संकटाला बळी ठरले आहे. दुष्काळ, नापिकी, नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारी, कर्ज वसुलीसाठी तगादा, मुलीचे लग्न, आजारपणा यासह अन्यकारणामुळे पश्चिम विदर्भात शेतकरी मृत्यूचा फास ओढत पासून राज्यातील शेतकरी आत्महत्या प्रवण१४ अमरावती जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या ची नोंद घेतल्या जात आहे. त्यानुसार अमरावती विभागात आतापर्यंत २०,५१६ प्रकरणामध्ये शासन मदत देण्यात असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयांनी दिली. शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करणार असल्याची घोषणा दोन दशकापासून प्रत्यक्ष प्रत्येक राज्यकर्त्याद्वारे करण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात या गंभीर विषयाकडे शासन प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. शासन निर्णय चा लाभ गरजू शेतकऱ्यांना मिळत नसल्याने, मृत शेतकऱ्यांच्या वर्षाला मिळणाऱ्या एक लाखाच्या शासन मदतीच्या निकाशात१९ वर्षापासून वाढ करण्यात आलेली नसल्याचे वास्तव आहे.सन २००१स्थीती एकूण शेतकरी आत्महत्या २०६३०, शासन मदत प्राप्त प्रकरण ९५१६, विविध कारणांनी नाकारली १०६७६, चौकशीसाठी प्रलंबित प्रकरणे ३०६ अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहे. मात्र, याची कारण मी माणसं जिल्हा प्रशासन ने केलेली नाही. शेतकरी आत्महत्या चा क्लस्टर शोधून उपाययोजना राबविण्याचे विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले होते. मात्र पुढे काहीच झाल्याचे दृश्य दिसून येत नाही. अमरावती जिल्ह्यात यंदाच्या सहा महिन्यात १७० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटुळले.दर३० तासात एक शेतकरी आत्महत्या होत असल्याची शोकांतिक आहे. मार्च महिन्यात सर्वाधिक ११७ प्रकरणे आहे. विभागात सहा महिन्यात ५५७ शेतकऱ्यांनी मृत्यूचा घोट घेतला आहे. यामध्ये सर्वाधिक ११७ शेतकरी आत्महत्या मार्च महिन्यात झाला आहे. जानेवारी ९०, फेब्रुवारी मध्ये १००, एप्रिल ९६, मे ८४ व जून मध्ये ७० शेतकऱ्यांची आत्महत्या झाली. जून अखेर १७०, यवतमाळ १५०, बुलढाणा १११, अकोला ९२ व वाशिम जिल्ह्यात ३४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटडले.

Previous articleएसटीची धडक, वृद्ध महिलेला बसने चिरडले; एसटी चालकावर गुन्हा दाखल.
Next articleअमरावती महानगरपालिका उपायुक्त पदावर माधुरी मडावी रुजू होणार.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.