Home अमरावती एसटीची धडक, वृद्ध महिलेला बसने चिरडले; एसटी चालकावर गुन्हा दाखल.

एसटीची धडक, वृद्ध महिलेला बसने चिरडले; एसटी चालकावर गुन्हा दाखल.

36
0

आशाताई बच्छाव

1000535336.jpg

एसटीची धडक, वृद्ध महिलेला बसने चिरडले; एसटी चालकावर गुन्हा दाखल.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती. (चांदूरबाजार)
अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार डेपोच्या बसने एका वृद्ध महिलेला चिरडले. अपघात चांदूरबाजार तालुक्यातील ग्राम सोनेरी येथे घडला. अपघातातील मृत महिलेचे नाव काडमीबाई दवडू भलावी वय ७५रा. बागवानी, ता. आठनेर,जि. बैतूल असे आहे. सदर महिला सोनोरीच्या थांब्यावर बच्ची वाट पाहत उभी होती. दरम्यान दुपारी १२च्या सुमारास एमएच १४-बीटी ०८९६ ही तंदूर बाजार की बस तिथे पोहोचली. यावेळी गावातील इतर प्रवाशासह सदर वृद्ध महिला देखील बसमध्ये चढण्यासाठी समोर आली. नेमक्या याच वेळी दरवाज्यातून बसमध्ये चढत असताना तोल जाऊन खाली पडली. तेवढ्यात बस सुरू झाली आणि ती महिला मागच्या चाकात चिरल्या गेल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शनी यांनी दिली. मृतक महिलेच्या मुलीच्या तक्रारीवरून बस चालक अतुल नारायण पावसे या. गुणवंतवाडी अमरावती यांच्याविरुद्ध ब्राह्मणवाडा थळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर ठाणेदार उल्हास राठोड हे घटनास्थळी दाखल झाले. दरबार सदर मध्ये चा मृत्यू देह चांदूरबाजारच्या उपजिल्हात शव विच्छादन साठी पाठविण्यात आले. सदर महिला ही चांदुर बाजार तालुक्यातील सोनेरी येथे राहत असलेल्या ममता रमेश उके हिला भेटायला आली होती. त्यावेळी तिची मुलगी ही शेतात मजुरीचे काम करत होती. बस थांबल्यावर अपघात झाल्याचे कळताच तिने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसात जाऊन तक्रार दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here