Home अमरावती सीआयडी अधिकाऱ्यांच्या वाहनाचा गुरुदेव नगर हायवे वर अपघात: कर्मचारी सुखरूप; स्टेरिंगचा जाईंट...

सीआयडी अधिकाऱ्यांच्या वाहनाचा गुरुदेव नगर हायवे वर अपघात: कर्मचारी सुखरूप; स्टेरिंगचा जाईंट तुटल्याने अपघात.

31
0

आशाताई बच्छाव

1000535334.jpg

सीआयडी अधिकाऱ्यांच्या वाहनाचा गुरुदेव नगर हायवे वर अपघात: कर्मचारी सुखरूप; स्टेरिंगचा जाईंट तुटल्याने अपघात.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती येथून नागपूरकडे जाणाऱ्या सीआयडी पोलीस वाहनाचा राष्ट्रीय महामार्गावरील गुरुदेव नगर ग्रामपंचायत जवळ स्टेरिंग चा रोड तुटल्याने अपघात झाला. अपघातात सुदैवाने वाहनातील २ अधिकारी व चालक सुखरूप बचावले. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता च्या समोरची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेलोरा गाडी क्रमांक एम एच-३० एच ४५९ या वाहनाने अकोला येथील सीआयडी अधिकारी संदीप पाटील, सुरेश तेल मोरे, व चालक सुखदेव नाईक हे उच्च न्यायालयाच्या कामाने नागपूरला जात होते. दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील गुरुदेव नगर ग्रामपंचायत समोर अचानक या वाहनाच्या स्टेरिंगचा बॉईज जॉईंट तुटला व सदर वाहन हे अनियंत्रित होऊन रस्ता दुभाजकावर धडकली. या धडकी मुळे सदर वाहना पुढे ५०० मीटर अंतरावर जाऊन थांबले यावेळी समोरून ट्रेलर येत होता. मात्र ट्रेलर चालकांनी सुद्धा त्यांचे वाहन कडेला सरकारवर संभव अपघात टाळला. अपघात ची माहिती तिवसा पोलिसांना देण्यात आली. त्यांनी सुद्धा अपघाताची नोंद घेतली असून या अपघातातील दोन्ही अधिकारी व चालक सुखरूप असल्याचे सांगितले. स्टेरिंग राड तुटल्यानंतर हे ट्रेलर वर धडकणार तोच पोलीस वाहन चालक नाईक यांनी वाहन नियंत्रित केले. दुसरीकडे टेलरवर हे वाहन धडकून आहे म्हणून ट्रेलर चालकांनी सुद्धा त्यांचे वाहन नियंत्रित करून कडेला नेले त्यामुळे मोठा अपघात टळला. हा एक प्रकारचा थरार होता. तो सीआयडी अधिकाऱ्यांनी अनुभवला. घटनेनंतर काही वेळ हे अधिकारी भयभीत होऊन बसले होते.

Previous articleनाशकात सिटीलिंक बसखाली चिरडून पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
Next articleएसटीची धडक, वृद्ध महिलेला बसने चिरडले; एसटी चालकावर गुन्हा दाखल.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here